युजीसी नेट परीक्षेसाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
जालना/प्रतिनिधी,दि. 1
युजीसी नेट डिसेंबर 2024 ही परीक्षा दि.3 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी युजीसी नेट परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.
परीक्षा केंद्र परिसरात अशांतता निर्माण होवून परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर या परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.