pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महाआघाडी भाजपला भुईसपाट करण्याच्या तयारीत

0 1 7 4 0 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29

ऐतिहासिक चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या धनदांडग्यांच्या बळावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा शिवसेना,शेकाप, कॉंग्रेस पक्षांच्या महाआघाडीच्या उमेदवारांनी चारही मुंड्या चीता करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. सरपंचासह १६ जागाही जिंकून भाजपला व्हाईटवॉश देण्याआधी महाआघाडीची एका जागेवर महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. महाआघाडीच्या महिला उमेदवाराची झालेली
बिनविरोध निवड महाआघाडीसाठी शुभशकुन मानला जात आहे.

ऐतिहासिक चिरनेर ग्रामपंचायतीची लोकसंख्या ९ हजार ५०० एवढी आहे.थेट सरपंच आणि १५ सदस्य संख्या असलेल्या पाच प्रभागात एकूण ४ हजार ८४० मतदार मतदान करणार आहेत.मागील निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर एका सदस्याचे संख्या बळ असलेल्या भाजपने या निवडणुकीत स्वबळावर लढविण्यासाठी शिरकाव केला आहे.विशेष म्हणजे ज्यांच्या अनधिकृत बांधकामांमुळे चिरनेरकरांना मागील तीन चार वर्षांपासून पावसाळ्यात महापुराचा सामना करावा लागत आहे.त्यांच्या विरोधात जनमताचा आक्रोश आहे. त्याच धनदांडग्यांच्या खांद्यावर भाजपने चिरनेरच्या निवडणुकीचा धुरा सोपवली आहे.
यामुळे आधीच रोष असलेल्या चिरनेरच्या मतदारांमध्ये भाजप विरोधात असंतोष आणखीनच वाढला आहे.या असंतोषाचा फटका निवडणुकीआधीच भाजपला बसला आहे.उमेदवार देता आला नसल्याने प्रभाग क्रमांक ४ मधुन महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.

त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिवसेना, शेकाप, कॉंग्रेस आदी पक्षांच्या महाआघाडीने शिवसेना- ५ + १सरपंच, शेकाप-३, कॉंग्रेस-७ असे सर्व संमतीने जागांचे वाटप करण्यात आले आहे.महाआघाडीतुन शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अनुभवी तसेच उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती भास्कर मोकल हे सरपंच पदाची निवडणूक लढवित आहेत. अजातशत्रु, मितभाषी अशी ओळख असलेले भास्कर मोकल भाजपच्या नवख्या उमेदवाराचा पराभव करून जवळपास ३ हजाराच्या आसपास मते घेऊन विजयी होतीलच.त्याच बरोबर महाआघाडीचे १५ सदस्य निवडून येतील.धनदांडग्यांच्या बळावर निवडणूक लढविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत भुईसपाट करतील असा ठाम विश्वास शिवसेनेचे उरण तालुका प्रमुख तथा आघाडीचे प्रवक्ते संतोष ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

तर ४० लाख उत्पन्न असलेल्या चिरनेर गावाच्या विविध विकासाच्या मुद्यांवर निवडणुकीला महाआघाडी सामोरे जात आहे.शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील,जे.एम.म्हात्रे,प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाआघाडीच्या स्थानिक पातळीवरील प्रामाणिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यावर महाआघाडी भाजपच्या सर्वच उमेदवारांना पराभवाची धूळ चालतील असा विश्वास महाआघाडीचे व शिवसेनेचे सरपंचपदाचे उमेदवार भास्कर मोकल यांनी व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे