pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सर्वना कुमार के. यांची नेमणूक

0 1 7 7 0 7

जालना/प्रतिनिधी,दि. 24

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने भारतीय निवडणुक आयोगाने 18-जालना लोकसभा मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सर्वना कुमार के. (IRS) (C&CE) यांची नेमणूक केलेली  आहे.
खर्च निरीक्षक सर्वना कुमार हे  दि. 24 एप्रिल 2024 पासून ते मतदानाचा दिनांक 13 मे 2024 पर्यंत शासकीय विश्रामगृह, जालना, सर्व्हे क्रमांक 488 येथील “पूर्णा ” या कक्षात उपलब्ध असणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्र. 9699564488 असा आहे. जालना लोकसभा मतदार  संघातील विधानसभा क्षेत्र 100-जालना, 101-बदनापूर, 103-भोकरदन, 104-सिल्लोड, 105-फुलंब्री व 110-पैठण येथील नागरिक लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही अनुचित घटनेची किंवा गैरव्यवहारासंबंधीच्या तक्रारी त्यांच्याकडे नोंदवू शकतात किंवा प्रत्यक्ष भेटून लेखी स्वरुपात सादर करु शकतात, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी (खर्च) राजू सोळूंके यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे