आर के एफ जे एन पी विद्यालयाचे निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
रुस्तमजी केरावाला फाउंडेशन जेएनपी विद्यालयात १० वीच्या मुलाच्या साठी निरोप समारंभ(आशीर्वाद दिवस )साजरा झाला. या कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे म्हणून चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड चे संस्थापक, आध्यक्ष तसेच पीटीए उपाध्यक्ष जेएनपी विद्यालय विकास कडू, विशाल पाटील, पालक प्रतिनिधी दर्शना कासुकर, पालक प्रतिनिधी अनिल ठाकूर आणी आरकेएफ प्रशासन कडून आरकेएफ जेएनपी विद्यालयाचे ऍडमिन विशाल माने सर, सुजा मॅडम,माध्यमिक विभाग मुखध्यापक गिरीश पाटील सर,प्राथमिक विभाग चे मुख्यध्यापक रमाकांत गावंड , उपमुख्याध्यापक जगदीश मढवी , सुपरवायझर टेमकर मॅडम,शशिकांत म्हात्रे सर, सना मॅडम,वर्षा म्हात्रे मॅडम, अमिता मॅडम, प्रिया पाटील मॅडम,जोगळे सर, रहीम सर दर्शना मॅडम, तेजश्विनी मॅडम, भूषण सर, टेमकर सर, के के सर हे उपस्थित होते.सदर पाहुण्यांचे स्वागत आरकेएफ जेएनपी विद्यालय चे मुख्याध्यापक गिरी्श पाटील सर यांनी केले
कार्यक्रम प्रसंगी सर्व मुलांचे स्वागत पालक प्रतिनिधी कडून पेन व गुलाब देऊन केले या वेळी शाळेकडून मुलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली काही निवडक विद्यार्थ्यांनी आपले भाषण केले.
मनोरंजन साठी विद्यार्थ्यांकडून शाळेला निरोप म्हणून विडिओ प्रेझेंटेशन केले नंतर काही नृत्य व नाटिका ही सादर केले. आपले मनोगत व्यक्त करताना विकास कडू म्हणाले की या शाळेने आज पर्यंत अनेक विद्यार्थ्यांना उच्च पदावर नेले आहे त्यांनी आपल्या आई वडिलांचे नव्हे तर संपूर्ण उरण, रायगड चे नाव उंचावले आहे. या शाळेत शिक्षकांबद्दल बोलायचे झाले तर मढवी सर , वर्षा मॅडम, टेमकर टीचर, टेमकर सर, मंजुळा मॅडम, भूषण सर यांचे मी खास कौतुक केले पाहिजे. कारण मी या शाळेच्या पालकांचे प्रतिनिधित्व करत आहे त्यामुळे माझ्या सोबत अनेक पालकांचे, मुलांचे संभाषण होते ते नेहमी या शिक्षकांबद्दल गोडवे गात असतात त्यांची शिकवण्याची पद्धत अदभूत आहे. शेवटी विकास कडू यांनी शाळेतील कर्मचारी दादा, आणी मावशी याचे ही कौतुक केले.व सर्व मुलांना परीक्षा साठी शुभेच्छा व आशीर्वाद दिला.तसेच विशाल पाटील यांनी आपले मनोगत मांडताना मुलांना सांगितले की तुमचे वडील आपल्या पोटाला चिमटा काढून तुमच्या शिक्षणाचा खर्च पुरवत आहे, म्हणून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करा.एवढे बोलून मुलांना शुभेच्छा दिल्या. माने सर, सुजा मॅडम, गावंड सर, गिरीश पाटील सर, टेमकर मॅडम यांनी आपल्या खास शैलित मनोगत मांडले.या कार्यक्रम दरम्यान शाळेकडून मुलांना खाऊ व शालेय साहित्य देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ठाकूर यांनी केले तर आभार प्रदशन गिरीश पाटील यांनी केले.