श्रीमती सरस्वतीबाई ढेकळे यांच्या निधनाने अनेकांनी शोक करुन भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली

जालना/प्रतिनिधी, दि.8
जालनाः पुर्वाश्रमीच्या नांदेड येथील श्रीमती सरस्वतीबाई ढेकळे यांनी जीवनात स्नेहनाते जोपासले व वृध्दापकाळाने शेवटी जालना वास्तव्यात त्यांचे दुःखद निथन झाले.या निधनाने अनेकांनी शोक करुन श्रध्दांजली व्यक्त केली.
ह.भ.प.स्व.रंगनाथराव ढेकळे यांच्या श्रीमती सरस्वतीबाई ढेकळे पत्नी होत्या.आपल्या जीवनात मराठवाड्यातील पाडुळी,पोहंडुळ ,नांदेड आदी ठिकाणी वास्तव्य करुन शेवटी जालना येथे त्यांचे वास्तव्य होते.प्रामुख्याने जुन्या पीढीतील रुढी,परंपरेचा आदर करुन विविध ठिकाणच्या शेजारधर्मात स्नेहनाते जोपासले.अशा या सोनार समाजातील श्रीमती सरस्वतीबाई रंगनाथराव ढेकळे यांचे नुकतेच वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या अंत्यविधीस व सांत्वनापर भेटीसाठी प्रामुख्याने या बदलत्या काळात त्यांच्यावर असलेले प्रेम नांदेडहुन आलेल्याअनेक महिला व पुरुषांनी श्रध्दांजलीपर व्यक्त केले.तसेच स्व.सरस्वतीबाई ढेकळे यांना रामतीर्थ ,जालना येथे अनेकांनी श्रध्दांजली वाहिली.त्यामध्ये जालना,मंठा,सेलु,वरधडी,संभाजीनगर,पुणे आदी ठिकाणाहुन सगेसोयरे,समाजबांधव,सामाजिक कार्यकर्ते ,स्नेहनात्यातील व्यक्तींनी शोक करुन श्रध्दांजली व्यक्त केली. त्यांच्या पश्चात एस.टी.खात्यातील सेवानिवृत कर्मचारी वंचाराम ढेकळे,पत्रकार आत्माराम ढेकळे,सामाजिक कार्यकर्ते नारायण ढेकळे ही त्यांची मुले असुन सुना,नातवंडे ,नातजावई असा मोठा परिवार आहे.