pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रशासन दिड वर्ष मागितलेली माहिती देत नाही पण साधे ऊतर देत नसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, वरीष्ठ अधिकारी नांदेड यांच्याकडे दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी निवेदनाद्वारे केली मागणी

0 3 8 4 4 1

नांदेड/प्रतिनिधी,दि.11

मा.जिल्हाअधिकारी साहेब नांदेड,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नांदेड
मा.ऊपमुख्यकार्यकारी साहेब पंचायत विभाग जि.प.नांदेड यांना भेटून निवेदनाद्वारे केली मागणी वरीष्ठ अधिकारी दखल घेऊन अधिष्ठाता शिस्त व माहिती अधिकाराची अंमलबजावणी करतील काय?
दिव्यांग बांधवांच्या अनेक प्रश्नांसाठी शासन प्रशासनाकडुन दखल घेत नसल्यामुळे अनेक सवलतीपासुन व वेळेवर हक्क मिळत नसल्यामुळे या.चंपतराव डाकोरे पाटिल यांनी माहितीचा अधिकार,अपिल नेहमी भेटुन सप्टे.२०२४ पासुन विस महिन्यात न्याय मिळत नसल्याची लेखि चार निवेदन देऊन त्या निवेदनाची दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी

१) माहितीचा अर्ज दि.१३ सप्टे.२०२४ माहिती मिळाली नसल्यामुळें पुन्हा अपिल.
२) प्रथम अपिल ११ नोव्हे.२०२४ यांची सुनावणी दि.२३ डिंसे.२०२४ ती झाली नाहि.
३)पुढील सुनावणी दि.२० जाने.२०२५ या सुनावणी ला सोळा पंचायत समिती पैकि नायगाव व मुखेड पंचायत समिती उपस्थित त्यांचे लेखि पत्र नाही व चौदा पंचायत समिती अनुपस्थित त्या सुनावणीत एका महिन्यात माहिती देण्याचे आदेश अध्याप माहिती मिळाली नाहि.
व अपिलीय अधिकारी यांच्याकडुन तिनं महिन्यानंतर अपिलार्थी पत्र प्राप्त कि आपले समाधान न झाल्यास या.राज्य माहिती आयुक्त खंडपिठात द्वितीय अपिल दाखल करता येईल पण ते युध्दात संपल्यामुळे मला द्वितीय कपिल करता आले नाहि.
पुन्हा माहिती अधिकार अर्ज दि.४ जुलै २०२५ दाखल.त्यांची वेळोवळी भेटुन सुध्दा माहिती मिळावी नाहि.
माहिती दोन महिने मिळत नसल्यामुळे दि.३ सप्टे.२०२५ रोजी अपिलीय अर्ज सादर करून पुन्हा भेटि घेऊन दखल घेतली नाही.
तिसरे निवेदनाद्वारे माहिती व अपिलीय अर्जावर सुनावणी घेऊन न्याय मिळावा म्हणून दि.१३ आक्टो.२०२५ ला निवेदन देऊन वारंवार फोन प्रत्यक्ष भेटून सप्टे.२०२४ पासुन आज पर्यंत म्हणजे चौदा महिन्यात माहिती व अपिलीय अर्जाची दखल समाज कल्याण अधिकारी जि.प.नांदेड यांनी घेतली नाहि.
तसेच *दुसरे कार्यालय उपमुख्य कार्यकारी पंचायत विभाग जि.प.नांदेड*
यांना माहिती अधिकार अर्ज खालिल प्रमाणे
१) माहिती अधिकार अर्ज दि.४ जुलै २०२५ अर्ज सादर
त्याबद्दल मी अपिलीय अधिकारी यांची भेट घेऊन विनंती केली असता त्यांचे संबधितास पत्र पाठविले दि.२६ ऑगस्ट २०२५ दोन महिने ऊतर मिळाले नाहि.
२) माहिती मिळत नसल्यामुळे अपिल दि.३ सप्टे.२०२५ कपिल करुन एक महिना ऊतर मिळत नसल्यामुळे प्रत्यक्ष दोन वेळा उपमुख्य कार्यकारी पंचायत विभाग नांदेड भेटुन व फोनवर संपर्क करून माहिती मिळाली किंव्हा सुनावणी झाली नाहि.
३) माहिती अर्ज व अपिल करुन चार महिने माहिती मिळत नसल्यामुळे सुनावणी घेऊन निर्णय द्यावा म्हणून दि.१३ सप्टे.२०२५ तिसरे निवेदन देऊन निर्णय होत नाहि.
*तिसरे कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड*
यांना माहिती अधिकार अर्ज खालिल प्रमाणे
१) माहितीचा अर्ज दि.४ जुलै २०२५ ला दाखल करून चार वेळा प्रत्यक्ष भेटुन चार महिन्यांत साधे ऊतर आपल्याहि कार्यालयातुन मिळाले नाही
एकाहि कार्यालयाचे माहिती अधिकाराचे ऊतर मिळत नसेल तर माहिती अधिकार वअपिलीय
कशासाठी यांचे लेखी ऊतर द्यावे.
दिव्यांगाना न्याय हक्क मिळावा म्हणून शासन दिव्यांग कायदा ,शासन निर्णय, अनेक सवलती ,दिव्यांगाना साहित्य मोजमाप घेऊन साहित्य पाठविले जाते .ते साहित्य वाटप न करता नायगाव प.स.गंजुंन खराब होते.ते आज अनेक प.स.मध्ये धुळ खात असेल त्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे अनेक वेळा धरने,मोर्चे,स्व- ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत बे.मुध्दत धरने आंदोलन केल्यानंतर संबंधित अधिकारी दिव्यांग संघटनेच्या समक्ष जिल्हाधिकारी नांदेड आठ वेळा बैठका,एकावेळी सुनावणी घेऊन संबंधित अधिकारी वरीष्ठाचे आदेशाची अंमलबजावणी करीत नसतील वेळेवर निवेदनाची दखल घेत नसतील तर दप्तर दिरंगाई कायदा कुठे आहे.
दिव्यांगाना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर दिव्यांग कायद्याप्रमाणे कार्यवाही का केली जात नाही.?
या सर्व विषयांवर लेखि ऊतर देण्यात व संबंधितांची कसुन चौकशी करुन योग्य ते कार्यवाही करण्यात यावी असे लेखि निवेदन श्री चंपतराव डाकोरे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे प्रसिध्दी पत्रक दिले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे