pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

29 ऑक्टोबरला पेंशन अदालतीचे आयोजन

0 3 8 4 4 1

जालना/प्रतिनिधी,दि.15

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानूसार पेंशन अदालत दि.29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जालना जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे.
आपली प्रकरणे पेंशन अदालतीमध्ये ठेवण्यासाठी सेवानिवृत्तांनी प्रलंबित प्रश्न, अर्ज, पोस्टाने, ई-मेल किंवा हस्तपोच जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात दि.24 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावेत. तरी पेंशन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे