टेंभुर्णी येथे अकोट च्या पायी दिंडीचा स्वागत संपन्न

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 30
टेंभुर्णी ता जाफराबाद येथील माऊली ट्रेडर्स च्या वतीने अकोट ते आळंदी चाललेल्या पायी दिंडीचे यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला त्यादरम्यान त्यांना चहा व फराळ देण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकोट ते आळंदी असे या दिंडीचा पायी प्रवास असतो. माऊली ट्रेडर्सचे संचालक श्री गबाजी जाधव श्री प्रकाश जाधव श्री दत्तू जाधव श्री संतोष जाधव यांनी दिंडीतील वारकऱ्यांना केलेल्या स्वागताबद्दल सांगितले की वारकऱ्यांचे पाय आपल्या दाराला लागताच जीवन सफल झाल्याचा अनुभव येतो. वारकऱ्यांचा स्वागत सत्कार व नाश्त्याचे नियोजन संजीवनी इंग्लिश स्कूलच्या प्रांगणामध्ये करण्यात आले. याप्रसंगी गावातील अनेक वारकरी उपस्थित होते त्यामध्ये श्री गंगाराम धनवई,श्री तानाजी उखर्डे,श्री बाबुराव जाधव,श्री मुंजाराम जाधव,श्री माणिकभाऊ पाचे, श्री मनोहर डोमळे,श्री अंकुश देशमुख,श्री रामेश्वर जोशी सर,श्री सांगळे सर, श्री रघुनाथ इंगळे ,श्री मधुकर लोणकर,श्री गणेश जाधव यांची उपस्थिती होती तसेच आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी श्री गोविंद जाधव सर,श्री सुरेश जाधव,श्री अंकुश घोडके, अमोल जाधव,श्री तुकाराम जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. माऊलींच्या पादुकांची आरती करण्याचा मान संजीवनी इंग्लिश स्कूल चे संचालक प्रा सतीश जाधव व सौ भाग्यश्री जाधव या दाम्पत्यांना मिळाला.

