बदनापूर येथील डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने
आज सर्व डॉक्टरांनी कोलकत्ता येथील दुर्र्देवी प्रकरणाच्या निषेधार्थ काळी फित बांधून रुग्णसेवा करुन त्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी डॉक्टरांंच्या वतीने करण्यात आली.
कोलकत्ता येथे ९ ऑगस्ट रोजी आर.जी. मेडीकल कॉलेज येथील एका तरुण पदव्युत्तर चेस्ट मेडिसीनच्या विद्यार्थिनीवर सेवा बजावत असतांना क्रुरपणे बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. सदरील घटनेने वैद्यकीय समुदाय व देशाला धक्का बसला आहे. ही घटना डॉक्टर्स विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांसाठी सुरक्षेच्या
आवश्यकतेचा संकेत देत आहे. यात पिडीतेच्या समर्थ्थनात आज सकाळपासून बदनापूर डॉक्टर्स असोशिएशन सर्व डॉक्टरांनी काळी फित बांधून रुग्णसेवा
केली. डॉक्टर्स असोशिएशनचे डॉ. अरुण खैरे, डॉ. किरण जर्हाड, डॉ. कासट,डॉ. दरक, डॉ. अर्जुन शेळके, डॉ. खांडेभराड, डॉ. गौरव तातेड, डॉ. राजु पवार, डॉ. प्रदीप कदम, डॉ. कृष्णा सरोदे, डॉ. मनोज वाळके, डॉ. शिवा
गायकवाड, डॉ. अविनाश गाभणे, डॉ. संतोष वाघ, डॉ. कुंडकर, डॉ. सुहास भागवत,डॉ. वैâलास भारती, डॉ. आव्हाड, डॉ. बदनापूरकर, डॉ. धांडे, डॉ. शिवा
गायकवाड, डॉ. राम पाटील, डॉ. प्रविण पवार, डॉ. सचिन उकर्डे, डॉ. राजपुत,डॉ. पंकज बोरुडे, डॉ. किशोर देशमुख, डॉ. गिराम, डॉ. वैâलास बनकर, डॉ.राहुल जैस्वाल, डॉ. जायभाये, डॉ. बाबासाहेब घनघाव आदी डॉक्टरांचा समावेश
आहे.