pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा येथील तीन विद्यार्थ्यांची NMMS शिष्यवृत्ती करिता निवड

0 4 2 1 5 3
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.25

जिल्हा परि षद उच्च प्राथमिक शाळा दुधा ही शाळा स्पर्धा परीक्षा चे केंद्र बनले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये या शाळेतील विद्यार्थी पात्र झालेले आहेत . यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा , नवोदय परीक्षा , एनएमएमएस परीक्षा या स्पर्धेमध्ये विद्यार्थी पात्र होत आहेत. तसेच यावर्षी जिल्हास्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक सुद्धा आलेला आहे. या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचे बक्षीस मिळालेले आहे . तसेच यावर्षी इयत्ता आठवी करिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने एन एम एम एस परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा केंद्र किर्ला तालुका मंठा जिल्हा जालना येथील तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती करता निवड झालेली आहे यामध्ये सार्थक खुळे भाग्यश्री शिंदे व स्नेहल जाधव या तीन विद्यार्थ्यांना पुढील चार वर्ष बारा हजार रुपये प्रमाणे 48000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे . या सर्व विद्यार्थ्यांचे व या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारे शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कांगणे सर सहाय्यक शिक्षक श्री निलेश पिसे सर व पंजाब दांदडे सर यांचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री गोविंद चव्हाण साहेब शिक्षण विस्ताराधिकारी श्री केजी राठोड सर किर्ला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री खरात सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती दुधा, ग्रामपंचायत कार्यालय दुधा व पालकांनी अभिनंदन केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 1 5 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे