pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महिला वर्ल्ड कप वर भारतीय महिलांनी विजय संपादन केल्यानंतर नंतर टेंभुर्णी मध्ये तरुणांचा जल्लोष.

0 3 8 3 5 2

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.6

हे वर्ष भारतीय क्रिकेट साठी चांगले म्हणावे लागेल कारण या वर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या सह भारतीय क्रिकेट टीम ने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि इतिहास मध्ये पहिल्या वेळी भारतीय महिला यांनी सर्व भारतीय यांना गर्व आणि अभिमान वाटवे अशी सुंदर कामगिरी करत पहिल्यांदा महिला विश्व चषक ला गवसणी घालत ऐतिहासिक कामगिरी केल्या बद्दल त्यांना ग्रामीण भागातून शुभेच्छा देण्यासाठी टेंभुर्णी येथील आदर्श क्रीडा मंडळ सह गावातील तरुण मंडळी यांनी ढोल ताश्याच्या आणि फटाक्याच्या अतिश बाजी करत शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला. सकाळी सर्व तरुण शिवाजी नगर मध्ये जमा होऊन भारत माता की जय जयकार करून सर्व सर्व महिला क्रिकेट सदस्य कर्णधार हरमनप्रित कौर श्रुती मानधना विशेषतः जेमिमा रॉड्रिक शेफाली वर्मा दीप्ती शर्मा रुचा घोष राधा यादव क्रांती गोर या सह सर्व खेळाडू सह सर्वच टिम ला शुभेच्छा देऊन टीम चे अभिनंदन केले.
या वेळी आदर्श टीम चे खेळाडू यांचा सह राजेश चव्हाण अलकेश सोमाणी संदीप जाधव स्वप्नील वाघमारे अभिषेक पिंपळे ज्ञानेश चव्हाण दत्ता पंडित पवन पाचे विशाल गुरव संतोष पाचे किरण सवडे सह आदी क्रिकेट प्रेमी तरुण उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे