pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

102-बदनापूर विधानसभा मतदार संघातून कुचे नारायण तिलकचंद विजयी

0 3 2 1 7 8

जालना/प्रतिनिधी, दि.24

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 102-बदनापूर मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील कृषि महाविद्यालय, बदनापूर येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुत्रावे यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 102-बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार कुचे नारायण तिलकचंद यांना 1,38,489 मते मिळाली. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बबलु नेहरुलाल चौधरी यांना 92,958 इतकी मते मिळाली. यात भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार कुचे नारायण तिलकचंद 45,531 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुत्रावे यांनी कुचे नारायण तिलकचंद यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुत्रावे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी डमरे यांची उपस्थिती होती.

102-बदनापूर विधानसभा मतदारसंघातून एकुण 17 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते  प्राप्त झाली आहेत.

 

.क्र. उमेदवारांचे नांव पक्ष मिळालेली मते
1 कुचे नारायण तिलकचंद भारतीय जनता पार्टी 1,38,489
2 बबलु नेहरुलाल चौधरी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 92,958
3 अन्ना साईनाथ चिन्नादोरे स्वाभिमानी पक्ष 1,050
4 आदमाने दिनेश दत्तात्रय रिपब्लिकन सेना 420
5 कटके जयश्री संजय महाराष्ट्र स्वराज्य पार्टी 461
6 नाडे ज्ञानेश्वर दगडुजी ऑल इंडिया फारवर्ड ब्लॉक 307
7 शैलेंद्र सुदाम मिसाळ पिपल्स पार्टी ऑफ इंडीया (डेमोक्रेटीक) 4,574
8 सतिश शंकरराव खरात वंचीत बहुजन आघाडी 4,965
9 संदीप आसाराम गवळी समता पार्टी 138
10 काकासाहेब बाबुराव भालेराव अपक्ष 608
11 गायकवाड संगिता अंकुश अपक्ष 253
12 चाबुकस्वार राहुल निरंजन अपक्ष 159
13 बाबासाहेब हरिभाऊ खरात अपक्ष 209
14 राजेश ओंकारराव राऊत अपक्ष 493
15 सचिन विलकिसन कांबळे, अपक्ष 916
16 सौ. सुश्मिता सुभाष दिघे अपक्ष 1,242
17 ॲड. संतोष काशिनाथ मिमरोट अपक्ष 1,145
18 नोटा 1,122

 

****

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे