25 जुन रोजी राजुरकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल

जालना/प्रतिनिधी,दि.24
हसनाबाद पोलिस ठाणे हद्यीतील भोकरदन तालुक्यातील मौजे राजुर येथे दि. 25 जुन 2024 रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री. गणपती दर्शनासाठी मोठया प्रमाणावर भाविक मराठवाडा, खानदेश, विदर्भ येथून येतात. तसेच जालना शहरातून व भोकरदन, जाफ्राबाद भागातून मोठ्या प्रमाणावर स्त्रिया, पुरुष, अबालवृध्द, लहान मुले पायी दर्शनासाठी येतात. तसेच नमुद तिर्थक्षेत्र स्थळास महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे. दर्शनासाठी येणारे भाविकांची गैरसोय होवू नये तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी व वाहतुकीची कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी म्हणून या दृष्टीकोनातून भोकरदन तालुक्यातील राजुरकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात अंशतः बदल करण्यात आला आहे. असे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन मी अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक, जालना यांनी पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत. आदेशानूसार भोकरदन चौफुली जालना येथून राजुर, भोकरदनकडे जाणाऱ्या जड वाहनधारकांनी (भक्तांची वाहने वगळून) आपली वाहने देऊळगांव राजा, जाफ्राबाद, माहोरा, भोकरदन मार्गाने जावे. तर भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापासून राजुर, जालनाकडे येणाऱ्या जड वाहनधारकांनी माहोरा, जाफ्राबाद, देऊळगांव राजा या मार्गाचा वापर करावा. या मार्गाची जड वाहतुक दि. 24 जुन रोजीचे सकाळी 10 वाजेपासून दि. 26 जुन 2024 रोजीचे 2 वाजेपर्यंत बदल करण्यात आलेला आहे. तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी. असे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.