pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ममता दिनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस शिवसेना उरण तर्फे विनम्र अभिवादन

0 1 7 4 1 6

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6

तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जन्म दिन हा ममता दिन म्हणून पाळला जातो, शनिवार दिनाकं ०६ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या ९३ व्या जन्म दिनी शिवसेना उरण शहर शाखेत व माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री नरेश रहाळकर यांनी मासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे,माजी उपनगराध्यक्ष परमानंद करगुटकर, उपतालुका संघटक के एम घरत, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, महिला आघाडी च्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका सुजाता गायकवाड, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, शहर संपर्क संघटिका वंदना पवार, शहर संघटिका मेघा मेस्त्री, उप तालुका संघटिका मनीषा ठाकूर, शहर उपसंघटिका रजिया शेख, माजि संघटिका रंजना तांडेल, अल्पसंख्याक सेल ता उपाध्यक्ष रुबीना कुट्टी, विभाग संघटिका कल्पना गराडे, शाखा संघटिका हसीमा सरदार, रुक्सना सय्यद, संजना कोष्टी,नलिनी मेश्राम, दीपा जाधव, दर्शना म्हात्रे, ग्राहक संरक्षण कक्ष शहर संघटक संदीप जाधव, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, विभागप्रमुख संजय गावंड, शाखाप्रमुख अजय म्हात्रे, मिलिंद भोईर, शेखर पडते, गटप्रमुख संदीप चव्हाण, ज्येष्ठ कार्यकर्ते माळी, शिरधनकर, नंदू पाटील, नंदूशेठ म्हात्रे, शिवा म्हात्रे, युवासेनेचे अमित म्हात्रे, सर्व कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे