जालना गणेश फेस्टिवलचे नुतन अध्यक्ष राजेंद्र गोरे यांची निवड झाल्याबद्दल आज 29 ऑगस्ट रोजी 11 वाजेच्या दरम्यान माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, जालना गणेश फेस्टिवलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला माझी दरवर्षी हजेरी असते. यावेळी जालना गणेश फेस्टीवलचे सांस्कृतिक कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे करावे व रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने गणेश फेस्टिवलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री. दानवे यांनी केले आहे. यावेळी किरण गरड, सुरेश मुळे, संजय देठे, अशोकराव आगलावे, प्रा.राजेंद्र भोसले, अशोक उबाळे, सुभाष कोळकर, सतिष देशमुख आदींची उपस्थिती होती.