pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बदनापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पीएम स्किल रन व प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.20

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बदनापूर जिल्हा जालना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि. 17 सप्टेंबर 3023 रोजी पीएम स्किल रन अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धां संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पदवीदान समारंभ व पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील महिला व पुरुष या दोन्ही गटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता 60 महिला स्पर्धक व 200 पुरुष स्पर्धक या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. व्ही. राऊत, तहसीलदार सुमन मोरे, चेअरमन जितेंद्र राठी, सहाय्यक परिवहन अधिकारी विजय काळे उपस्थित होते. यांच्या हस्ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्तीपत्र व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच संस्थेतील सर्व उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी प्राचार्य डी. एम. राठोड यांनी परिश्रम घेतले. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4