भारतीय जनता पार्टी जालना शहर आणि ग्रामीण अंतर्गत मंडळ प्रमुख निवडीसाठी रविवारी ( ता. 20) सकाळी 11.00 वा. भाजपा कार्यालय, संभाजीनगर, जालना येथे माजी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी निरीक्षक किरण पाटील, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, आ. संतोष पाटील दानवे, आ.नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश
राऊत, रामेश्वर भांदरगे, विजय कामड, विमलताई आगलावे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्याताई देठे, महानगर अध्यक्ष सतीश जाधव यांच्या सह माजी नगरसेवकांची उपस्थिती राहणार असून बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जालना महानगर अध्यक्ष सतीश जाधव यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा