pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण ते ठाणे, उरण ते सीएसएमटी, उरण ते पनवेल थेट ट्रेन सुरु करून ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याची शिवसेना, युवासेनेची मागणी.

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

उरणला रेल्वे आल्यापासून अनेक नागरिक दळणवळणा साठी रेल्वेचा मोठया प्रमाणात वापर करू लागले आहेत. सर्वात सुरक्षित विश्वसनीय व आरामदायी कमी खर्चाचा व कमी वेळेत योग्य स्थळी पोहोचण्याचा उत्तम सुविधा म्हणून नागरिक रेल्वे सेवेकडे पाहत आहेत.मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या उरण ते बेलापूर, उरण ते नेरुळ या मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या कमी व वेळेत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर अत्यंत कमी फेऱ्या आहेत. या मार्गावर जास्तीत जास्त फेऱ्या वाढवाव्यात व ठाणे, सीएसएमटी, पनवेल या ठिकाणी थेट रेल्वे सेवा सुरु करून या ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्ष व युवा सेनेच्या वतीने पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे.

सिडकोने द्रोणागिरी शहर लोकवस्तीसाठी तसेच मालाची आयात निर्यात करण्यासाठी वखारी, कंटेनर फ्रेंट स्टेशन बसविले आहेत. मुंबईला पर्याय म्हणून सिडको शहर बसविले आहे. द्रोणागिरी शहरा पासून मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे महानगरपालिका तसेच मुंबई- पूणे हायवे तसेच मुंबई- कोकण-गोवा हायवे जाडलेले आहे. द्रोणागिरी शहरा शेजारी न्हवा शेवा बंदर हे (जेएनपीए ) ७५ लाख कंटेनर हाताळणारे भारतातील नंबर १ बंदर आहे. आणि येथे जे.एन.पी.ए चे विशेष आर्थिक क्षेत्र सेझ आहे. तसेच येथे ओएनजीसी , एमएसईबी बीपीसीएल , आयओटीएल , आयओसीएल , एमआयडीसी , रिलायन्स , कस्टम हाऊस, जेएनपीए टाऊनशीप येथे बसविले आहे. येथे असलेल्या असंख्य कंपन्यांमुळे येथे लाखो कामगार (माथाडी ड्रायवर, सीएचए ईत्यादी ) काम करत आहे. या सर्व सामान्य व मध्यवर्गीय लोकांना स्वस्त व वेळेत कार्यालयात पोहोचविणारे विश्वसनीय प्रवासाचे साधन म्हणजे पॅसेंजर ट्रेन ला पथम प्रसंती दिली जाते. येथे न्हावा शेवा बंदर स्थापन होऊन ३५ वर्षे झाली. ३५ वर्षा नंतर ट्रेन व अटल सेतू सुरू झाला आहे. जर प्रवासाची साधने योग्य वेळीच सुरू झाली असती तर द्रोणागिरी शहराची भरभराट झाली असती.असा सर्व उरणचा इतिहास व भूगोल असताना मध्य रेल्वेने द्रोणागिरीच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी उरण ते सीएसएमटी व उरण ते पनवेल व उरण ते ठाणे ट्रेन सूरू करून लोकलच्या फेऱ्यामध्ये वाढ करावी. सध्या स्थितीत उरण ते नेरूल व उरण ते बेलापूर लोकल सूरू आहे. परंतू मुंबई व पनवेल हे ट्रेन नसल्यामुळे चाकरमान्यांना नेरूल व बेलापूरला उतरून पुढील ट्रेन पकडावी लागते. सदर ट्रेन मध्ये खूप गर्दी असल्यामुळे दाटी वाटीने उभ्याने प्रवास करावा लागतो. प्रवासात दमछाक झाल्याने कामावर परिणाम होत आहे.प्रवाशांच्या शारिरीक वा मानसिक त्रास कमी करण्यासाठी व सुरक्षित प्रवासाठी मध्य रेल्वेने उरण ते मुंबई व उरण ते पनवेल व उरण ते ठाणे अश्या ट्रेन सुरू करून पॅसेंजर ट्रेनच्या फेऱ्या वाढवून तमाम द्रोणागिरी वाशियांना, चाकरमान्यांना आणि उरणच्या प्रवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पत्रव्यवहारच्या माध्यमातून शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर,युवासेना उरण तालुका अधिकारी करण हरिश्चंद्र पाटील तसेच विभागप्रमुख रुपेश पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सतत पाठपुरावा सुरु ठेवणार असल्याचे शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर,युवासेना उरण तालुका अधिकारी करण हरिश्चंद्र पाटील तसेच विभागप्रमुख रुपेश पाटील यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे