pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय सबज्युनीयर नेटबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

0 1 7 4 0 7

जालना/प्रतिनीधी,दि.29

महाराष्ट्र अ‍ॅम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व नंदुरबाल जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजीत 16 वी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा दि. 6 ते 8 ऑक्टोंबर 2023 दरम्यान नंदुरबार याठिकाणी संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या वतीने दि. 2 ऑक्टोंबर 2023 सोमवार रोजी संध्याकाळी 5 वाजता इंडियन स्पोर्टस अ‍ॅकडमी मैदान, पाठक कॉम्पलेक्सच्या समोर, मुक्तेश्‍वर वेशीजवळ, कचेरी रोड, जुना जालना याठिकाणी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर निवड चाचणीत सहभागी होण्याकरीता खेळाडुची जन्तारीख 8 ऑक्टोंबर 2007 किंवा नंतरची असावी, निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नसुन निवड चाचणीतुन 12 मुले व 12 मुलींची निवड करण्यात येईल. निवड झालेले खेळाडु राज्यस्तरीय स्पर्धेत जालना जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करतील.
अधिक माहितीसाठी असोसिएशनचे सचिव शेख चाँद पी.जे., मो.नं. 9822456366 किंवा गोवर्धन वाहुळ, मंगेश सोरटी, संतोष वाघ, श्रीमती किरण पाटील, शेख समीर, सोहेल खान यांच्याशी संपर्क साधावा.
सदर निवड चाचणीत जालना जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयीन खेळाडुंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बाला परदेसी, क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद, संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी रेखा परदेसी, बबन दादा सोरटी, प्रा. गायत्री सोरटी, श्रीमती वैशाली सरदार, तालुका संयोजक यशवंत कुलकणी, उमेशचंद्र खंदारकर, सचिन मोहीते, विजय वाघमारे व जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे