pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शेवा कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे धूळखात पडल्याने शेवा कोळीवाडा विस्थापितांमध्ये संतापाचे वातावरण.

0 3 6 7 2 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27

जेएनपीटी (जेएनपीए )या महत्वाच्या प्रकल्पासाठी जुना शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने जेएनपीटी(जेएनपीए )बंदरांसाठी विकल्या. जमीन संपादन करताना जुना शेवा कोळीवाडा गावातील स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत प्राधान्य, पुनर्वसन, विविध मूलभूत सेवा सुविधा पुरविण्याची हमी जेएनपीए प्रशासनाने दिले होते. मात्र ही हमी हवेतच विरले आहे. जेएनपीटी(जेएनपीए )प्रशासनाने उरण तालुक्यातील जुना शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी/बिगर शेतकरी २५६ कुटुंबांना उरण तालुक्यातील मौजे बोरीपाखाडी उरण येथे ९१ गुंठे जमिनीत तात्पुरते संक्रमण शिबीरात गेली ४० वर्ष ठेवले आहे.मात्र कायमस्वरूपी पुनर्वसन केले नाही. व वेगवेगळ्या महत्वाच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळे जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )विस्थापिताना वेळोवेळी अनेकदा केंद्र व राज्य सरकार विरोधात लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलने केली होती.पण राज्य व केंद्र सरकारने विस्थापितांचे संप, आंदोलन, मागण्यांची कोणतेही दखल घेतली नाही.४० वर्षांपासून २५६ कुटुंब आजही पुनर्वसनापासून वंचित आहेत.त्यामुळे सर्वांनी एकत्र येत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय शिपिंग, वॉटर व पोर्ट मंत्रालयाकडे जेएनपीएने २०२३ मध्ये शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचा पाठविलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच शेवा कोळीवाडा गावातील २५६ कुटुंबीयांचे पुनर्वसन रखडल्याची बाब शुक्रवारी (२२) उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान निदर्शनास आली आहे. यामुळे केंद्र सरकारविरोधात विस्थांपीता मध्ये संतापाची लाट उसळली आहे.गेली ४०वर्षापासून गावातील २५६ कुटुंबीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.गेली ४० वर्षापासून शेवा कोळीवाडा गावातील २५६ कुटुंबीयांचा केंद्र, राज्य सरकारविरोधात संघर्ष सुरू आहे.मात्र संघर्षानंतरही विस्थांपीताना न्याय मिळालेला नाही. ४० वर्षांपासून २५६ कुटुंबाचा पुनर्वसनचा प्रश्न प्रलंबित होता. इतर मागण्याही प्रलंबितच होते.यामुळे विस्थांपीतांनी महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिका कर्त्यांच्या वतीने ऍड. रशीद खान व ऍड.सिद्धार्थ इंगळे यांनी बाजू मांडली तर केंद्र व जेएनपीए प्रशासनाची बाजू मांडताना ऍड.डी.पी.सिंग, अमित पाटील यांनी सांगितले की वर्ष २०२३ मध्ये केंद्रीय शिपिंग, वॉटर व पोर्ट मंत्रालयाकडे विस्थांपीतांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.आता पुढील सुनावणी ४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.पुनर्वसनाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. याप्रकरणी पाठपुरावा सुरू आहे तसेच याप्रकरणी अभ्यासासाठी आणखी काही दिवसांची मुदत देण्याची विनंती केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ४ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.चाळीस वर्षापासून जेएनपीटी (जेएनपीए) प्रशासन, केंद्रीय मंत्रालय व रायगड प्रशासन विस्थापितांची सातत्याने दिशाभूल करत आहेत, तरीही आजतागायत कोणताही निर्णायक निर्णय घेण्यात आलेला नाही.यामुळेच न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिशवर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंद‌कुमार पवार यांनी सुनावणीनंतर दिली.केंद्र आणि राज्य सरकारने जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ग्रामस्थांना वेळोवेळी पुनर्वसन करण्याचे व इतर महत्वाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन कधीही पूर्ण केले नसल्याने आता जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा ) विस्थांपीतां मध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 6 7 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे