pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ओएनजीसी उरण प्लांटच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन.

0 1 7 4 0 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17

रक्तदानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने व गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा या अनुषंगाने ओएनजीसी उरण प्लांटच्या वतीने बुधवार दि २० डिसेंबर २०२३ रोजी ओएनजीसी मेन गेट, द्रोणागिरी भवन उरण येथे सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीरात मुंबई व नवी मुंबई मधील नामांकित रुग्णालय मधील रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमास सुबोजित बोस कार्यकारी निदेशक संयंत्र व्यवस्थापक उरण, एम.सी. गौतम महाव्यवस्थापक – आधारभूत सेवा, श्रीमती भावना आठवले महाव्यवस्थापक प्रभारी मानव संसाधन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रक्तदान करणे ही काळाची गरज आहे.रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन देशकार्याला हातभार लावावा. रक्त दात्यांनी रक्तदानाला येताना कोणतेही एक ओळखपत्र (आधारकार्ड, पैनकार्ड, मतदान कार्ड, काम करीत असलेल्या कंपनीचे ओळखपत्र) सोबत आणावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी, रक्तदात्यांनी ओएनजीसी उरण प्लांटचे अध्यक्ष प्रकाश दळवी, उपाध्यक्ष पराग कदम, कार्याध्यक्ष संदिप गावडे, सरचिटणीस प्रदिप मयेकर, उपाध्यक्ष मनोहर थळी -9969227950, सचिव-बाळकृष्ण काशिद – 9969227951 /8169931575,
सचिव उज्जेश तुपे – 8291281697, 9764165427 यांच्याशी संपर्क साधावे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे