pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

टेंभुर्णी दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा ठिकठिकाणी गौरव

प्रिंट मीडियाचे स्थान अबाधित : सचिन खामगळ। ;टेंभुर्णी : येथील ग्रामससंद यांच्या वतीने यांनी पत्रकारांचा केलेला गौरव

0 1 7 4 0 9

 

टेंभुर्णी/प्रतिनिधी,दि.7

दर्पण दिनाच्या निमित्ताने येथील पोलीस स्टेशन ग्राम संसद कार्यालय व व्यवसायिकांनी ठिकठिकाणी पत्रकारांचा गौरव केला या निमित्ताने येथील पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार तसा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पीजी तांबेकर यांची उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना श्री खामगळ यांनी सांगितले की सद्यस्थितीत सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर वेगवान बातम्यांचा आढावा घेतला जात असला तरी आजच्या काळातही प्रिंट मीडियाला अनन्यसाधारण महत्त्व आहे ग्रामीण भागातील पत्रकार सर्वाधिक अपडेट राहून वार्तांकन करतात नाविन्यपूर्ण बातम्यांचा शोध घेत ग्रामीण भागात केली जाणारी पत्रकारिता आदर्श पत्रकारिता असून टेंभुर्णी सारख्या गावात असणारे पत्रकार सजग राहतात यामुळे जिल्ह्यात टेंभुर्णीच्या सर्वाधिक बातम्या आपल्याला वाचावयास मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले याप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकारांचा त्यांनी शाल श्रीफळ देऊन गौरव केला.
येथील ग्राम संसद कार्यालयातही पत्रकारांच्या गौरवांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी व्यासपीठावर श्री तांबेकर यांच्यासह सरपंच गौतम मस्के उपसरपंच संतोष पाचे माजी सरपंच विष्णू भाऊ जमदाडे लक्ष्मण शिंदे ग्रामविकास अधिकारी जगदीश आढाव, ग्रामपंचायत सदस्य फैसल चाऊस, रवींद्र उखर्डे, पांडुरंग बोरसे, प्रमोद उखर्डे, किशोर कांबळे , भिकन का पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. गावाच्या विकासात्मक कामामध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून पत्रकारांच्या माध्यमातून गावातील विविध प्रश्न मार्गी लागत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले.
येथील व्यावसायिक सतीश काबरा यांनी सर्व पत्रकारांचा डायरी व पेन देऊन गौरव केला. या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय राऊत नसीम शेख रावसाहेब अंभोरे अलकेश सोमानी बालाजी शेवाळे शेख अशपाक फकृ कुरेशी, शेख साबेर, सुनिल भाले,अशोक पाबळे, हर्षद शेख प्रताप नवले,प्रल्हाद जाधव,बी डी सवडे मनिष कुलथे विष्णू मगर राज भाले यांच्यासह पत्रकाराची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे