तिवसा तालुक्यातील फत्तेपूर, जावरा शिवारात बिबट्याची भीती:गोठ्यातील दोन शेळ्या फस्त केल्याचा संशय,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.5
तिवसा तालुक्यातील फत्तेपूर जावरा येथे मंगळवार १ रोजी रात्रीच्या वेळी गावानजीक असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या असून यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याचा परिसरातील वावर असल्याचा संशय असून शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. मौजा फत्तेपूर येथे घरालगतच असलेल्या गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून शेळ्या फस्त केल्याची घटना बुधवार २ रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. फत्तेपूर येथील नितेश देवीदास कठाणे, असे पीडित पशू पालकांचे नाव आहे. पीडीत पशू पालक हा शेतकरी असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून गत काही वर्षांपासून पशू पालनाचा व्यवसाय करीत आहे. संबंधित पशू पालकाकडे जवळपास गावातच ५० ते ६० शेळ्या असून, दिवसा शेळ्यांना चराईसाठी नेऊन संध्याकाळच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठयात बांधले जाते. नेहमीप्रमाणे पशू पालकाने चराईसाठी नेलेल्या शेळ्या रात्रीच्या दरम्यान घरालगतच असलेल्या गोटयात बांधून ठेवल्या होत्या. मात्र, रात्री अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला असून यासंदर्भात आधीक तपास तिवसा वन विभाग करीत आहे. परिसरातील शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. बिबटाने मारलेल्या शेळीसह बिबट्याने शेळ्या मारल्याचा शेतकऱ्यांना आला संशय ^घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. परंतु, घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे किंवा पाऊलखुणा आढळून आल्या नाहींत, यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे. सध्या केवळ संशय व्यक्त होत आहे.