न्यायालय परिसरात ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.24
भारत निवडणूक आयोगाने आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 10/12/23 ते 29/02 /24 या कालावधीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी न्यायालय परिसरामध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यावेळी प्रधान जिल्हा न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, मुख्य न्याय दंडाधिकारी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा सरकारी अभियोक्ता, जिल्हा वकील संघ आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. हे प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार सुनिता वैष्णव, मास्टर ट्रेनर एस जी वांगे, सतीश मगरे, कैलास तिडके यांनी काम पाहिले आणि ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनशी संबंधित शंकांचे निराकरण केले.