आमदार जवळगावकर यांची पिंपरखेड कवाना माळझरा येथे सांत्वन भेटी

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.11
मागील आठवड्यात हदगांव तालुक्यातील माळझरा येथे हाके, पिंपरखेड येथे शेख तर कवाना येथे असोले परीवारात निधन झाले होते. माळझरा येथील हाके परिवारातील सुशिलाबाई माधवराव हाके यांचे वयाच्या 83या वर्षी वर्धापकाळाने निधन झाले होते. तर पिंपरखेड येथील शेख इस्माईल भाई यांच्या कुटुंबातील मुलगी महेजबिन सय्यद गौस यांचे वयाच्या 35 व्यावर्षी अपघातात निधन झाले होते.तर कवाना येथील माजी सरपंच वैजंताताई आसोले यांच्या आई कोंडाबाई रामराव आसोले यांचे वयाच्या 52व्या वर्षी निधन झाले होते. त्यावेळी आमदार जवळगावकर मुंबई येथे असल्याने त्यांचे मतदारसंघात येणे न झाल्यामुळे मतदार संघात आल्यावर आमदार जवळगावकर यांनी माळझरा पिंपरखेड कवाना येथील तिन्ही गावात शेख असोले व हाके या कुटुंबाच्या घरी जाऊन येथे सांत्वन भेट दिली.
यावेळी बाळू पाटील पार्डीकर राजेश जैन, पिंपरखेड माजी सरपंच पिंटु पाटील,बाळासाहेब वाकोडे ,ओम प्रकाश येवले, हट्टी नाईक, काळूराम राठोड, शेख इस्माईल, शेख बिबन शेख शौकत, शेख जावेद सय्यद गौस ,शेख नाझीम , देविदास रावजी नाईक, वसंतराव हाके, गुलाबराव हाके, कवाना उपसरपंच संदीप पवार यांच्यासह तिन्ही कुटुंब गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.