pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अमरावती जील्यामधून ब्रेकिंग बातमी समोर येत आहे

0 3 2 1 8 0

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.3

मोर्शी : अमरावती दर्यापूर अकोला रोडवर आज दुपारच्या सुमारास दोन चार चाकी मध्ये भिषण अपघात होऊन 3 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोन भरधाव कार या समोरासमोर आल्या त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास दर्यापूर – अकोला रोडवर दोन भरधाव चार चाकी वाहन एकमेकांवर आदळले सदरचा अपघात हा ग्राम लासूरच्या डोंगराजवळच्या मध्यभागी झाला या अपघातात विनीत गजाजनराव बिजवे प्रतीक माधवराव बोचे असे आधार कार्ड आढळून आले आहे. अपघात झालेल्या एका गाडी मध्ये चार जण प्रवास करीत होते तर दुसऱ्या एका गाडीत दोघे प्रवास करीत होते या पाच जणांपैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गोलू बाहेकर नामक व्यक्ती रुग्णालयात उपचारासाठी आंत असतांना वाटेतच त्याचा हि मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत केली.
या अपघातामध्ये एका कारमधील आनंद बाहकर (२६ वर्षे रा. सांग्लुडकर नगर), बंटी बिजवे (३८ वर्षे रा. गजानन मंदिर साईनगर), प्रतीक बोचे (३५ वर्षे रा. सांग्लुडकर नगर) या तिघांचा मृत्यू झाला. तर कार मधील चौथा पप्पू घाणीवाले जखमी झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल हे दोघे जण जखमी झाले आहेत. प्रतीक, आनंद, बंटी आणि पप्पू हे चौघे कारने अकोल्याला जात होते. तर विरुद्ध दिशेने आकाश आणि रमेश अकोल्यावरून दर्यापूरकडे जात होते.घटनास्थळी येवदा पोलिसांनी धाव घेतली आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. रुग्णालयाबाहेर मृतकांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे