राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या अशा झाल्या बदल्या!
जालन्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची बदली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत प्रशासन अधिकारी म्हणून तर ; जालन्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांची बदली जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी
जालना/प्रतिनिधी, दि.3
जालन्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची बदली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत प्रशासन अधिकारी म्हणून झाली आहे.
डॉ. दिपक माळी यांची बदली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे सहायक संचालक म्हणून झाली आहे.
पालघरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांची बदली जालन्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
बृहन्मुंबईचे दक्षिण विभागाचे निरीक्षक देवीदास महाजन यांची बदली ठाण्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
अमरावती विभागी मंडळाचे सहसचिव तेजराव काळे यांची बदली परभणी जिल्हा परिषदेत योजना विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
– अहिल्यानगरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची बदली जळगाव जिल्हा परिषदेत योजना विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
– कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबेकर यांची बदली कोल्हापूर जिल्हा परिषदेत योजना विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
अकोल्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर- रोडगे यांची बदली पुणे जिल्हा परिषदेत योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
परभणीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड यांची बदली रायगड जिल्हा परिषदेत योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
अहिल्यानगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.
नांदेडच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे-वाडीयार यांची बदली परभणीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
जालन्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांची बदली जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून झााली आहे.
यवतमाळच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांची बदली वर्धा येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांची बदली धाराशिव जिल्हा परिषदेत योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
जळगावचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाअल यांची बदली बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची बदली नांदेडच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
साताऱ्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांची बदली सातारा येथे योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकाारी सुवर्णा सावंत यांची बदली कोल्हापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
लातूर विभागाचे विभागीय सहसंचालक दत्तात्रय मठपती यांची बदली लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी झाली आहे.
बीडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची बदली अमरावती येथील आदिवासी विकास आयुक्तालयात शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.
सांगलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनाही एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांची बदली नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
मुंबईच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहायक संचालक सरोज जगताप यांची बदली नाशिकच्या योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे.
ठाण्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले- कावडे यांची बदली महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून झाली आहे.
रायगडच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांची बदली कोकण व रत्नागिरीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण सहसचिव म्हणून झाली आहे.