pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू  

0 1 7 6 8 1

जालना/प्रतिनिधी,दि.25

  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राचे परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मतदारांच्या गर्दीचा फायदा घेवून मतदान प्रक्रियेस अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आणि कायदा व सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न समाजकंटक लोकांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेले अधिकारानुसार जालना जिल्ह्यातील 99- परतूर व 100- घनसावंगी या  विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राचे 100 मीटर परिसरातील खालीलप्रमाणे कृती करणेस मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी    डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत

 17- परभणी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी निवडणूकीची अधिसुचना भारत निवडणूक आयोगाव्दारे प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानूसार तात्काळ प्रभावाने आचार संहिता लागु झाली असून 17- परभणी लोकसभा मतदार संघातील मतदान दि.  26  एप्रिल 2024 रोजी होणार आहे. 17 – परभणी लोकसभा मतदार संघामध्ये जालना जिल्ह्यातील 99- परतूर व 100- घनसावंगी या  विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

लोकसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया खुल्या, निर्भय, शांतातमय वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. तसेच मा. निवडणूक आयोगाचे निर्देशाप्रमाणे सदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरीता तसेच जालना जिल्हयातील 99 परतूर व 100 घनसावंगी या विधानसभा मतदार संघात मतदान – केंद्रावर मतदान साहित्यासह मतदान पथक दि. 25 एप्रिल 2024 रोजी पोहचणार असून त्यांचे जवळ ईव्हीएम, व्हि.व्हि. पॅट व इतर संवेदनशील साहित्य राहणार आहे. त्यास अपाय होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जालना जिल्ह्यातील 99- परतूर व       100 -घनसावंगी या विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राचे ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागु करणे आवश्यक झाले असल्याची माझी खात्री झाली आहे.

मतदान केंद्रापासून 100 मीटर त्रिजेच्या परिसरात प्रचार करणे, बेकायदेशीर जमाव करणे, हत्यार बाळगणे, मतदारांना अमिष दाखवणे, मतदारांना मतदान करण्यापासुन रोखणे, धुम्रपान करणे, ज्वलनशील पदार्थ नेणे. मतदान केंद्रापासुन 100 मीटर त्रिजेच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये ध्वनिवर्धक किवा ध्वनिक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो तसाच्या तसा ऐकवणारा उपकरण संच वापरणे किंवा चालविणे. 100 मीटर प्रतिबंधित त्रिजेच्या क्षेत्राचे बाहेरील भागावरून ध्वनिक्षेपकांचा असा वापर करणे की, ज्यामुळे मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि मतदानासाठी येणारे मतदार यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यामध्ये बाधा निर्माण होणार नाही.  मतदान केंद्रापासुन 100 मीटर त्रिजेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे वाहन आणने. मतदारांना ने-आण करण्यासाठी अनाधिकृतपणे वाहनांचा वापर करणे. मतदान केंद्रापासुन 100 मीटर परिसरात राजकीय नेत्यांचे फोटो, चिन्ह वापरणे आणि घोषणा करणे. मतदान केंद्रापासुन 100 मीटर त्रिजेच्या परिसरात हॉटेल, टेलीफोन बुथ, झेरॉक्स मशीन, फेरीवाले यांनी व्यवसाय करणे. सदरचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीची कर्तव्य बजावणारे सर्व अधिकारी व कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि मतदान केंद्रावर मतदानासाठी येणारे मतदार यांना लागु राहणार नाही. सदरचा आदेश दि. 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल रोजीचे 24.00 वाजेपर्यंत लागु राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 6 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे