अमरावतिच्या निंभार्णी मधे बिबट्याची दहशत, गावकरीही हैराण.
वनाधिकाऱ्यांनी पोलिस पाटील व सरपंचांनी घटनेची पाहणी केली आहे,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.3
मोर्शी : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मोर्शी तालुक्यातील निंभार्णी एकच वेळी बिबट्याने गोठ्यावर हल्ला केलेला आहे. हल्ल्यात 1 गाय, जागीच ठार केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
निंभार्णी या गावात वन्यप्राणी बिबट्या हा गावाच्या शेजारी येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत आहे. अंबादास मारबादे यांच्या गोठ्या वर हल्ला केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे मोबदला देण्यात यावा तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत तर्फे उपसरपंच वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
बिबट्याच्या जनजागृतीसाठी गावात दवंडी –
निंभार्णी गावातून बिबट्यासंदर्भात निवेदन आल्यानंतर कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच गावकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी गावात दवंडी दिल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले. तसेच रात्रीच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नये अशी मागणी केली आहे.