महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांची आज भाजपा जिल्हा कार्यालयात संवाद बैठक

जालना/प्रतिनिधी,दि.22
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे हे दिनांक २३ मे २०२५ रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते भारतीय जनता पक्षाच्या जालना जिल्हा कार्यालयात भेट देणार असून, सकाळी १०.०० वाजता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांसोबत एक संवाद बैठक घेणार आहेत. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते श्री.रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे यांची उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीत पक्षाची संघटनात्मक घडामोडी, जिल्ह्यातील वस्त्रोद्योग विकासाचे प्रश्न, स्थानिक समस्या व जनतेच्या अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहून आपल्या सूचना, मतप्रदर्शन आणि विचार मांडावेत असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.