pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री क्षेत्र येवती( लघु आळंदी) येथील मठाधिपती सद्‌गुरू नराशाम महाराज येवतीकर यांचा ४६ वा वाढदिवस अतिशय भव्य स्वरूपात उत्साहात साजरा

0 3 8 3 5 3

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.18

मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती (लघु आळंदी)
येथील जागृत देवस्थान सद्‌गुरू नराशाम महाराज मठ संस्थांनचे मठाधिपती श्री सद्‌गुरू नराशाम महाराज यांचा ४६वा वाढदिवस मोठ्या उत्साहात भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला आहे. श्री सद्गुरू नराशाम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरु चा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविकांनी एकच गर्दी केली आहे.
मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथे श्री सद्‌गुरू नराशाम महाराज जागृत मठ संस्थान आहे. या संस्थांनचे मठाधिपती सद्‌गुरू नराशाम महाराज यांचा ४६वा वाढदिवस सद्‌गुरू सेवा समितीतर्फे नुकताच स्वागत लॉन्स एअरपोर्ट रोड नादेड येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सद्‌गुरू नराशाम महाराज यांची औक्षवंत, पाद्यपूजा, पुष्परचना, फळ तुला करण्यात आली आहे. यावेळी ३१ सुहासिनी यांनी सद्‌गुरू नराशाम महाराज यांना औक्षवंत करून शुभेच्छा दिल्या आहेत. सदगुरु सेवा समितीच्या
वतीने यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्‌गुरू नराशाम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरु चा आशीर्वाद घेण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी व भाविकांनी एकच गर्दी केली आहे.
यावेळी भागवताचार्य श्री सुनील महाराज आष्टीकर,नायगावचे आमदार श्री राजेश संभाजीराव पवार, पोलीस महानिरीक्षक नांदेड (आय जी) श्री शहाजी उमाप साहेब व सौ पुनमताई राजेश पवार माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड श्री प्रवीण पाटील चिखलीकर माजी जिल्हा परिषद सभापती नांदेड,नांदेड उत्तरचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर , यांची सौभाग्यवती सौ संध्याताई कल्याणकर ,शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील बेंबरेकर, डॉ. शिरटकर साहेब, डॉ. तुंगवनवार साहेब, डॉ.मलबा पाटील, डॉ.ढगे साहेब, डॉ.काबरा साहेब, डॉ. डुब्बे साहेब,
हेमंत बेंडे सर, भार्गव राजे सर, विशाल चौधरी सर , बांधकाम व्यवसायिक कमलेश बच्चेवार, पत्रकार महेश राजे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळू महाराज जोशी येवतीकर,राजू पाटील मोकासदरेकर, व्यंकट पदमवार नांदेड, संतोष महेंद्रकर मुखेड पांडुरंग पाटील टाकळीकर नांदेड, महेश धूमशेटवार नांदेड,दत्तात्रय पाटील टाकळीकर नांदेड, नंदकुमार दाचावार सकनूर, संतोष मेडेवार मुखेड , चंद्रकांत काचमवार टेंभुर्णीकर, राजकुमार कोटगिरे नांदेड संतोष भाई , प्रमोद काचावार मुखेड, पत्रकार कैलास टेंभुर्णीकर नरसी,श्रीनिवास गुंडाळे औरंगाबाद, संदीप उत्तरवार नांदेड, इत्यादी सद्गुरु सेवा समिती मधील भक्तगणांनी विशेष सहकार्य केले . येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी अवधूत बेंडे, अभिषेक राजे, अनिरुद्ध राजे, वेदांत चौधरी,आदी सह अनेकांनी पुढाकार घेतला आहे.
असे प्रसिध्दी सदगुरु सेवा समितीच्या वतीने दिले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे