शिवसेनेतर्फे नादुरुस्त फुंडे मार्गाची तिसऱ्यांदा दुरुस्ती.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर व विधानसभा संपर्कप्रमुख महादेवशेठ घरत यांचे दुरुस्ती साठी मोठा योगदान.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
उरण शहर व जेएनपीटी या आंतराष्ट्रीय बंदरा पासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर वसलेल्या फुंडे, डोंगरी व पाणजे या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील फुंडे रस्त्यातील खाडीपूल एप्रिल 2021 मध्ये अचानक कोसळला, या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या डाऊर नगर येथील एका तरुणांला आपला जीव गमवावा लागला होता, बंद झालेल्या या रस्त्यामुळे फुंडे, डोंगरी व पाणजे गावांना व जेएनपीटी बंदर परिसरातील कामगारांना खूप त्रास होत होता, अशावेळी सर्वांच्या मदतीसाठी पुढे असणारे शिवसेने(उद्धव ठाकरे गट )चे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर व उरण विधानसभा संपर्कप्रमुख कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते महादेवशेठ घरत यांनी हा रोड स्वखर्चाने तयार करून व दोन वेळा स्वखर्चाने दुरुस्ती केली होती.
मात्र या मार्गाने प्रवासी वाहनां बरोबरच डम्पर सारख्या जड वाहनांची वाहतूक सुरू झाली, त्यामुळे या मार्गाला प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये पावसाळ्यात भर पडल्याने दीड ते दोन फुटांचे चिखलाने भरलेले धोकादायक खड्डे आशा मार्गातून येथील नागरिक प्रवास करावा लागत होता. या चिखलमय व खड्डेयुक्त धोकादायक रस्त्याची दुरुस्ती शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर व उरण विधानसभा संपर्कप्रमुख कामगार नेते महादेवशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनाकं 20 आगस्ट 2023 रोजी पुन्हा एकदा केली आहे. त्यामुळे या मार्गावरील तीन गावातील हजारो नागरिकांना व जेएनपीटी परिसरातील कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.