अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा जालना दौरा
जालना/प्रतिनिधि,दि.6
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे हे दि.7 मार्च 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.7 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी करतील. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत घनसावंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी करतील. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत परतूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी करतील. सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत मंठा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी करतील. सोयीनुसार मंठा येथून वाहनाने पुणेकडे प्रयाण करतील.