pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कोप्रोली(उरण )ते श्री क्षेत्र कार्ला (लोणावळा )बाईक रॅलीचे आयोजन.

0 3 2 6 0 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8

मुंबई, नवी मुंबई, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकण किनार पट्टीवर आगरी कोळी कराडी समाजाचे मोठया प्रमाणात वास्तव्य असून या समाजाचे आराध्य दैवत म्हणून लोणावळा तालुक्यातील श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. अडी अडचणीत आई एकविरा भाविक भक्तांच्या पाठीशी सदैव उभी असते अशी भाविक भक्तांची व आगरी कोळी कराडी समाजाची श्रद्धा आहे. त्यामुळे आगरी कोळी कराडी समाजातील व्यक्ति हे नेहमी श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा माता मंदिर येथे जाऊन आई एकविरेचे दर्शन घेऊन नतमस्तक होत असतात. रायगड जिल्ह्यात विशेषत: उरण तालुक्यात आई एकविरेला माननाऱ्यांची, आई एकविरा मातेला पूजणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे आई एकविरा मातेचे महात्म्य लक्षात घेता भक्तांना वर्षातून एकदा तरी वारी करण्याच्या दृष्टीने दरवर्षी पावसाळ्यात बाईक रॅली काढली जाते. कोप्रोली गावातील आई एकविरा मातेचे भक्त देवीचंद म्हात्रे यांनी सण २०२२ मध्ये या रॅलीची सर्वप्रथम सुरवात केली होती. सण २०२२ मध्ये सुरु झालेली ही रॅली आजही अखंडीतपणे तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच जोमाने सुरु आहे. आजपर्यंत या बाईक रॅलीला आई एकविरा मातेच्या कृपेने कोणतेही गालबोट लागले नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, कोणालाही त्रास न देता बाईक रॅली काढली जाते हे या बाईक रॅलीचे खास वैशिष्ट्य आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता कोप्रोली (उरण )ते श्री क्षेत्र कार्ला (लोणावळा )या मार्गावर भव्य दिव्य असे बाईक रॅली काढण्यात येणार आहे.कोप्रोली गावचे भक्त देवीचंद म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांना या रॅलीतून वेगळाच आनंद, समाधान भेटत असतो. त्यामुळे दरवर्षी बाईक रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांची संख्या वाढतच आहे. यंदा बाईक रॅलीचे ४ थे वर्ष आहे.यंदा रविवार २२ जून २०२५ रोजी कोप्रोली गावातून बाईक रॅली निघणार असून ज्यांना ज्यांना या बाईक रॅलीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी देवीचंद म्हात्रे – ९८२१८३८४०८,
विधाता पाटील – ९९२०८६२०२९,
प्रसाद पाटील – ९७६९६०४०१२,
चेतन गावंड – ९८१९७५९१०५,
पिंट्या नाईक – ८४१९९३६१३४ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोट (चौकट ):-

रॅलीची दिनचर्या खालीलप्रमाणे
* सकाळी ६:३० वाजता कोप्रोली(उरण )मधील आई एकविरा मंदिरात आरती

* सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मान वंदना देऊन रॅलीला प्रारंभ

* दांडफाटा येथे नाष्टा साठी थांबणे

* दुपारी १२ च्या दरम्यान श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा मातेचे दर्शन

* दुपारी भोजन

* एकविरा मंदिराची साफसफाई

* एकविरा मंदिर परिसरात वृक्षारोपण

* संध्याकाळी ठीक ४ वाजता परतीचा प्रवास

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे