pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महासंस्कृती महोत्सव जालना 15 फेब्रुवारीला रामानंद प्रस्तुत महाराष्ट्राची लोकगाणी; सेम सेम बट डिफ्रंट एक सांगितीक प्रवासची मेजवाणी

0 1 7 4 1 1

जालना/प्रतिनिधी,दि.14

महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी जालन्याचे भूमीपूत्र राजकुमार तांगडे व संभाजी तांगडे यांच्या उपस्थितीत सेम सेम बट डिफ्रंट एक सांगितीक प्रवास व रामानंद कल्याण प्रस्तुत महाराष्ट्राची लोकगाणी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
गुरूवार दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी  5:00  ते 6:30 या वेळेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रख्‍यात सिनेनाट्य अभिनेता राजकुमार तांगडे व संभाजी तांगडे हे उपस्थित राहतील. यावेळी सेम टु सेम बट डिफ्रंट – एक सांगितीक प्रवास हा कार्यक्रम जालना भूमीपुत्र कैलास वाघमारे, जान्हवी श्रीमानकर सादर करणार आहेत. तर सायं. 6:30  वा. रामानंद कल्याण प्रस्तुत महाराष्ट्राची लोकगाणी हा कार्यक्रम जालना भूमीपुत्र शाहीर रामानंद उगले व शाहीर कल्याण उगले हे सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे