संत गाडगे महाराज राज्यस्तरीय युवा कार्यगौरव पुरस्काराने राजेश दिवटे सन्मानित

पाटोदा/नितिन भोंडवे,दि.17
यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, तसेच झुंज दिव्यांग संस्थेचे कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, प्रेरणादायी व्याख्याते, लेखक राजेश बाबासाहेब दिवटे यांना नुकताच श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल ओतूर, संत गाडगे महाराज विचारमंच आणि ज्ञानज्योत फाउंडेशन पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वै दलितमित्र प्रल्हाद मारुती पाटील यांच्या १३ स्मृतिदिनानिमित्त श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक अनंत कदम यांच्या हस्ते संत गाडगे महाराज राज्यस्तरीय युवा कार्यगौरव पुरस्काराने युवा व्याख्याते राजेश दिवटे सन्मानित करण्यात आले. राजेश दिवटे हे जीवन जगत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचारावर वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व युवकांना मार्गदर्शन करत असतात. अत्यंत गरीब मुलांनीही शिक्षण घेतले पाहिजे यासाठी सतत धडपडत असतात. आणि याच कार्याची पावती म्हणून राजेश जी दिवटे सर हे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलने त्यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र सगर संस्थापक काव्य मित्र संस्था पुणे, कृषी तज्ञ रश्मीकुमार अब्रोल, जुन्नर तर स्वागत प्रमुख म्हणून नितीन पाटील संचालक , संयोजक रणजीत पवार, राजेश साबळे, कविता काळे, अर्चना नेवकर, आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.