pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नेर शाळेच्या खेळाडूंचा राष्ट्रीयस्तरावर डंका

0 1 7 4 0 8

विरेगाव /गणेश शिंदे दि.28

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या २० व्या सब- ज्युनिअर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वाधिक पदक जिंकत भारतात प्रथम येण्याचा मान मिळविला. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने २४ सुवर्ण पदक, ०७ रौप्यपदक व ०३ कास्य पदक पटकावत प्रथम क्रमांकाचे अजिंक्यपद चषक मिळविले. या संघातील जालना जिल्ह्यातील नेर जिल्हा परिषद प्रशालेच्या चार खेळाडूंनी दैदीप्यमान कामगिरी केली आहे. यामध्ये नेर शाळेच्या विराज प्रदीप काळे याने ३० सेकंद स्पीड प्रकारात सुवर्णपदक तर ३ मिनिट इंडोरन्समध्ये कांस्यपदक पटकावले. अंडर १४ गटात कृष्णा प्रल्हाद तरासे याने डबल अंडर पियर्स रिले प्रकारात रौप्यपदक व ३० सेकंद स्पीड प्रकारात कांस्यपदक पटकावले. प्रशिक सुनील पाईकराव याने डबल अंडर पियर्स रिलेमध्ये रौप्यपदक पटकावले. यश गोविंद गोरे याने ३ मिनिट इंडोरन्स मध्ये रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्र संघात जालना, नाशिक, ठाणे, बुलढाणा, लातूर, अहमदनगर, पालघर जिल्ह्यातील खेळाडूंची निवड झाली होती. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून उमेश खंदारकर, जालना तर संघ व्यवस्थापक म्हणून अमोल आहेर, नाशिक यांनी काम पहिले. या खेळाडूंना टोकीओ ऑलिम्पिकचे निरीक्षक अशोक दुधारे, नयना नायर, ठाणे, प्रदीप राठोड, नाशिक, अमन वर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे नेर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य भागवत अंकल उफाड, माजी पं.स.सदस्य विजय राठोड, सरपंच तेजस कुळवंत, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. भरत वानखेडे, गट शिक्षणाधिकारी श्रीमती आसावरी काळे, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव शेख चांद पीजे, आकाश मेहरा कोठीवाले, संदीप पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे