pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

 तेली समाजातील गुणवंतांचा आज जालन्यात गौरव सोहळा

समाज बांधवांनी उपस्थीत रहावे - अशोक पांगारकर

0 1 1 8 2 2
जालना/प्रतिनीधी,दि.12
श्री संत संताजी बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना तर्फे उद्या दि.13 ऑगस्ट रविवार रोजी जालना शहरातील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा  आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यास समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जालना तेली समाजाचे अध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक एम.पांगारकर यांनी केले आहे.
जालना शहरातील गायत्री नगर परिसरातील श्री संताजी मंगल कार्यालयात उद्या रविवारी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच भविष्यातील यशस्वी वाटचालीत त्यांना योग्य दिशा मिळावी आणि आपणही समाजाचे देणे लागतो ही भावना त्यांच्यामध्ये रुजावी या उद्देशाने जालना जिल्हा तेली समाजाच्या वतीने प्रत्येक वर्षी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात येत असतो.यावर्षी देखील इयत्ता 10 वी,12 वी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसह जेईई,एमएचटी सीईटी,नीट,टीईटी आदी परीक्षेत प्रावीण्य मिळवणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान,या गौरव सोहळ्यानंतर कार्यक्रम स्थळीच श्री संत संताजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या उद्घाटन सोहळ्याच्या नियोजना संदर्भात सर्व समाज बांधवांची सर्वसाधारण सभा आयोजीत करण्यात आली आहे.गौरव सोहळ्यासह सभेस सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जालना तेली समाजाचे अध्यक्ष अशोक पांगारकर व अन्य पदाधिकार्‍यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2