pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

१०० पोलिसांनी खड्ड्यामध्ये‎ओतली ६९ हजार बॉटल दारू‎:ग्रामीण पोलिसांनी १५ वर्षांपासून विविध गुन्ह्यात जप्त केली होती दारू‎

0 3 1 3 9 1

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.17

ग्रामीण पोलिसांनी मागील १५ वर्षांपासून विविध गुन्ह्यात जप्त केलेली तब्बल ६९ हजार ४१२ बॉटलमधील दारू कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रविवारी दि. १३ शहराबाहेरील एका मैदानात खड्डा खोदून त्यात नष्ट केली आहे. या कामासाठी रविवारी सकाळी साडेसात पासून सायंकाळी साडेसातपर्यंत तब्बल शंभर पोलिस अंमलदार व अधिकारी या कामात व्यस्त होते. नष्ट केलेल्या दारूची किंमत ४७ लाख ७४ हजार रुपये होती.ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील २२ पोलिस ठाण्याअंतर्गत विविध कारवायांमध्ये जप्त केलेली ही दारू होती. राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत पोलिस स्टेशनला बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मुद्देमाल निर्गतीची विशेष मोहीम ग्रामीण पोलिसांकडून राबवण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला एक हजार रुपयांवरील दारूबंदी अधिनियमाखालील दारूचा मोठा मुद्देमाल बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असल्याने पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार कायदेशीर प्रक्रिया करून ती दारू नष्ट करण्याचे आदेश होते. त्या अंतर्गत एलसीबीने राज्य उत्पादन शुल्क विभागाशी २२ पोलिस स्टेशनचा मुद्देमाल नष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर १३ एप्रिलला तो मुद्देमाल नष्ट करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रशांत वानखडे व संतोष वायाळ यांच्या उपस्थितीत अचलपूर येथील १२ गुन्ह्यांतील, परतवाडा ३०, चांदूर बाजार ४०, शिरजगाव २२, सरमसपुरा ७, मोर्शी ३०, बेनोडा ५३, शिरखेड १२, नांदगाव खंडेश्वर १०, माहुली १८, खोलापूर ४३, कुऱ्हा २०, चांदूर रेल्वे ६, तळेगाव ४६, मंगरूळ दस्तगीर २१, येवदा १७, खल्लार २२, अंजनगाव ६३, पथ्रोट ८ गुन्हे, रहिमापूर १०, धारणी ३३ व चिखलदरा २३ अशा एकुण ५४६ गुन्ह्यांतील ६९ हजार ४१२ बॉटल देशी- विदेशी दारू नष्ट करण्यात आली. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय किरण वानखडे, डीएसबीचे पीआय सतीश पाटील व संबंधित पोलिस स्टेशन प्रभारी व हेडमोहरर यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पाडली.सकाळी ७ वाजता शहरालगत असलेल्या कोंडेश्वर भागातील एका खुल्या मैदानात ६९ हजार ४१२ बॉटल दारू घेवून पोलिस पोहोचले. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने सुमारे १० फूट खोल खड्डा तयार करण्यात आला. त्यानंतर तब्बल १२ तास प्रत्येक बॉटलचे झाकण उघडून बकेटीत दारू ओतली व बकेटमधील दारू खड्ड्यात टाकण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शंभरावर पोलिसांना रविवारी रात्री साडेसात वाजले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 3 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे