pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संजयनगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

0 1 7 5 5 0
जालना / प्रतिनिधी,दि.21
जालना शहरातील संजयनगर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त २३ ते ३० एप्रिलपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  या सप्ताहात  सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, ८ ते ९ ज्ञानेश्वरी प्रवचन,  ११ ते १२ गाथा भजन,   सायं ४ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ८ भोजन, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन होईल.
यात दि. २३ एप्रिल रोजी हभप महंत संजीवदास पाटील, दि. २४ रोजी हभप शिवचरित्रकार गोपाल थोटे, दि. २५ रोजी हभप. बालकिर्तनकार सोहम सातपुते, दि. २६ रोजी हभप योगिता देवकर, दि. २७ रोजी हभप. भागवत दोबोले, दि. २८ रोजी हभप महंत महादेव गिरी, दि. २९ रोजी हभप सतीश बनकर, दि. ३० रोजी हभप किसन जाधव यांचे कीर्तनाने सांगता होणार आहे. मृदंगाचार्य म्हणून परमानंद महाराज गिरी, वैभव महाराज म्हसकर, गायनाचार्य तुकाराम महाराज मुंगळे (लातुरकर), भोपळे महाराज, लक्ष्मण काळवणे महाराज, बरसाले बाबा, श्रीराम बंकट, विणेकरी हभप नामदेव म. घुले हे राहणार आहेत. २७ एप्रिल रोजी बिरजू बाबुलाल यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. तर २९ एप्रिल रोजी दिंडी मिरवणूक निघणार आहे. याचा परिसरातील भाविक -भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक महेश संपतराव नागवे युवा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 5 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे