संत भगवान बाबा आश्रम शाळा आन्वी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न.

जालना/प्रतिनिधी, दि.8
आज (दि. 07) रोजी संत भगवान बाबा आश्रम शाळा आणि तालुका बदनापूर पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत 52 वे तालुका विज्ञान प्रदर्शन ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान’ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा संत भगवान बाबा आश्रम शाळाआन्वी येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्राथमिक गटातील व माध्यमिक गटातील एकूण 11 केंद्र मधील 45 शाळा 66 प्रयोग या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विज्ञानांचे प्रयोग वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विज्ञान प्रयोग केले होते. यामध्ये समाज उपयोगी व शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून प्रयोगाचे परिक्षण करण्यात आले. यावेळी प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक जि. प. शाळा देव पिंपळगाव, द्वितीय क्रमांक जि. प. प्रा. शाळा विल्हाडी व तृतीय क्रमांक संत भगवानबाबा प्राथमिक आश्रमशाळा आन्वी ने पटकावला व त्याचबरोबर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक नानासाहेब पाटील विद्यालय नजिक पांगरी , द्वितीय क्रमांक आदर्श विद्यालय सायगाव व शिवाजी विद्यालय दाभाडी ने पटकावला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बदनापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. उदयसिंग राजपूत व कार्यक्रमाचे अध्यक्ष बदनापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. डी. एन. क्षीरसागर साहेब व प्रभारी विस्तार अधिकारी मस्के एम एन तसेच बदनापूर तालुक्यातील सर्व केंद्रातील केंद्र प्रमुख । शाळेतील सहशिक्षक व विदयार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी केद्रप्रमुख गिरामसर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तरक कर्मचार्यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उध्दव गीते व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद पवार यांनी केले.