ब्रेकिंग
घनसावंगीच्या जनतेचा अंतिम टप्प्यात सतीश घाटगेंना कौल !
घाटगे पाटलांना पाठींबा देण्यासाठी २४ तास रांगा

pub-7425537887339079
विधानसभा निवडणूक 2024 ही ऐतिहासिक ठरणार असल्याचा अंदाज सर्वच जण आता व्यक्त करू लागले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना शिंदे गट या पक्षाच्या अधिकृत उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवार सतीश घाटगे यांची लोकप्रियता प्रचंड वाढली असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी 24 तास जनतेच्या रांगा सतीश घाटगे यांच्या निवासस्थानी आणि सभेच्या ठिकाणी लागू लागल्या आहेत.
घनसावंगी विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा राजकीय पक्षांच्या उमेदवारांना जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे. कारण आत्तापर्यंत घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि समस्यावर कोणीही परखडपणे बोललं नाही. तसेच या समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी विकासाचे शाश्वत व्हीजन कुणीही मांडले नाही. या निवडणुकीत सतीश घाटगे यांनी घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख समस्या आणि भविष्यातील आव्हाने यावर आधारित आपले विकासाचे व्हिजन जनतेसमोर अतिशय स्पष्टपणे मांडले. तसेच हे व्हीजन सत्यात कसे उतरवणार आहे, याची ब्ल्यू प्रिंट देखील जनतेसमोर मांडली आहे. सतीश घाटगे यांचा विकासाचा अजेंडा जनतेमध्ये लोकप्रिय ठरला असून घनसावंगीच्या विकासासाठी परिवर्तन गरजेचे आहे, असा निर्धार जनता करत असल्याचे दिसत आहे. सतीश घाटगे यांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक जालना, अंबड आणि घनसावंगी तालुक्यातून गावागावातील जनता पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.
निर्णायक घडीला निर्णायक कौल…
घनसावंगी तालुक्यातील रामसगाव , शेवता, बानेगाव , भोगगाव या गावांच्या दौऱ्यात सतीश घाटगे यांना जनतेचा मोठा पाठींबा मिळाला. या ठिकाणी झालेल्या कॉर्नर सभेस गावकरी मोठ्या संख्येने जमले होते. गावकऱ्यांनी एकमुखाने सतीश घाटगे यांना साथ देण्याचा विश्वास दिला.