
छ.संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.6
बजाजनगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ
(दिंडोरी प्रणित) सेवा मार्गाचे पिठाधिश आदरणीय परमपूज्य गुरुमाऊलीं यांच्या आशीर्वादाने श्रीराम नवमी निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बजाजनगरच्या वतीने भव्य दिव्य पालखी सोहळा काढत संपन्न झाला.
यावेळी परिसरातील महिलांनी आपल्या अंगणात रांगोळी काढून दिंडीचे स्वागत केले होते. महिलांनी फुगड्या खेळल्या.
श्रीराम नामाचा जयघोष करत पावली हीं खेळण्यात आली.बाल गोपाळ ही या आनंदात सहभागी झाले होते.
त्याच बरोबर आगामी काळात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे त्या बद्दल विशेष प्रचार प्रसार करण्यात आला. दुपारच्या शुभ मुहूर्तावर सेवा केंद्रात प्रभू श्रीराम जन्मोउत्सव भक्तीगीत गात संपन्न झाला.
महाआरती नंतर भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी रांजनगाव, वडगाव, पंढरपूर, वाळूज परिसरातील भक्त उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीते साठी उत्सव समितीच्या पदाधीकारी व सेवेकऱ्यांनी प्रयत्न केले.