pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना लोकसभा मतदारसंघात 6 मे पर्यंत वाटप होणार मतदार माहिती चिठ्ठी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

बीएलओ करणार मतदार माहिती चिठ्ठी वाटप ;  बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन

0 1 7 9 8 1

जालना/प्रतिनिधी,दि.30

   जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या सहा विधानसभा मतदारसंघात दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघातील सर्व मतदारांना दि. 6 मे 2024 पर्यंत मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी  जाऊन ही मतदार माहिती चिठ्ठी वाटप करणार आहेत. आपणाकडे मतदान माहिती चिठ्ठी घेऊन येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

            जालना लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 61 मतदान केंद्र असून 10 लाख 34 हजार एकशे 6 पुरुष मतदार, 9 लाख 33 हजार 416 स्त्री मतदार, 52 तृतीयपंथी मतदार असे एकूण 19 लाख 67 हजार 574 मतदार आहेत. तर 2 हजार 379 सैन्य दलातील मतदार आहेत.

            18-जालना  लोकसभा  मतदारसंघात एकूण  6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून 2 हजार 61 इतकी  मतदान  केंद्रे आहेत. त्‍याचा  तपशील  खालील  प्रमाणे.

            विधानसभा मतदार संघाचे नाव –  101- जालना विधानसभा मतदारसंघ, मतदान  केंद्राचा तपशील- शहरी-224, ग्रामीण-105, एकूण-329—102-बदनापुर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ मतदान  केंद्राचा तपशील- शहरी- 41, ग्रामीण- 317 एकूण-358— भोकरदन, विधानसभा मतदारसंघ- 32, 297, 329— सिल्‍लोड, विधानसभा मतदारसंघ-       58, 298, 356— फुलंब्री, विधानसभा मतदारसंघ—98, 257, 355 पैठण,विधानसभा मतदारसंघ-34, 300,334— एकुण- शहरी-487, ग्रामीण-1574,एकूण-2061.

            मतदारसंघात एकूण  मतदारांची  संख्‍या 19,67,574   इतकी  असून  विधानसभा मतदारसंघ निहाय तपशील  खालील  प्रमाणे आहे.(दि. 25.4.2024नुसार)— विधानसभा मतदार संघाचे नाव -जालना—पुरुष-173975, स्‍त्री-154222, इतर-35, एकुण-328232, बदनापुर, (अ.जा.)- 168340, 153548, 5, 321893,

भोकरदन-162987, 149038,  0, 312025, सिल्‍लोड-   179017, 160826, 4, 339847, फुलंब्री- 184985, 166819, 4, 351808,  पैठण-164802, 148963,   4, 313769, एकुण मतदार-1034106 933416, 52, एकूण- 1967574.

            मतदारसंघात एकूण  सैन्‍यदलातील मतदारांची संख्‍या 2, 379   इतकी  असून विधानसभा मतदारसंघ निहाय तपशील  खालील  प्रमाणे आहे. विधानसभा मतदार संघाचे नाव—जालना- पुरुष-113, स्‍त्री-3, इतर-0, एकुण- 116, बदनापुर, (अ.जा.)- 185, 5, 0, 190, भोकरदन-990, 20, 0, 1010, सिल्‍लोड – 563,  14, 0, 577, फुलंब्री-    342, 10, 0, 352, पैठण—134, 0, 0, 134, एकुण मतदार-2327, 52,0,2379.                               मतदारांना दिल्या जाणाऱ्या या मतदार माहिती चिठ्ठीमध्ये संबंधित मतदारांना त्यांचा मतदार यादी भाग क्रमांक, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदारांचे नाव,मतदार ओळखपत्र क्रमांक यासह मतदान  केंद्राचा संपूर्ण पत्ता, मतदान केंद्र शोधण्यासाठी क्यु आर कोड, मतदानाचा दिनांकदिनांक व वेळ, जिओ टॅगचा मतदान केंद्राचा नकाशा यासह अन्य बाबींचा समावेश केलेला आहे.

         दि. 29 एप्रिल 2024 ते 6 मे 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी  जाऊन सदरील मतदार माहिती चिठ्ठी वाटप करणार आहेत. यावेळी बीएलओ यांच्याकडे बीएलओ रजिस्टर असणार असून यात मतदारांची मतदान चिठ्ठी प्राप्त झाल्याबद्दल स्वाक्षरी घेतली जाणार आहे. ज्या मतदारांना त्यांचे मतदान माहिती चिठ्ठी मिळाली नाही अशा मतदारांनी आपल्या यादी भागाच्या यांच्याशी संपर्क करावा. सर्व बीएलओंची यादी जालना जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    सर्व मतदारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपणाकडे मतदान माहिती चिठ्ठी घेऊन येणाऱ्या सर्व बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे