pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वीजबिल भरूनही वीज कर्मचाऱ्यांनी दमदाटी करत ग्राहकाचे वीज मीटर तोडले

ग्राहकांसोबत उद्धट वर्तन करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.

0 1 7 4 7 6

उरण/ विठ्ठल ममताबादे,दि.3

उरण तालुक्यात वीजेचे बील भरूनही श्री अनिल वामन पडते यांच्या मालकी हक्का च्या दुकानाचे वीज मीटर महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी काढून नेले आहे. विशेष म्हणजे सदर ग्राहकाला महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही नोटीस न देता, मोबाईल वर मेसेज न टाकता ,न कळविता वीज मीटर काढून नेले आहे. वास्तविक पाहता वीज बील कींवा थकबाकी नसताना, कोणाच्या तरी सांगण्यावरून ही द्वेषापोटी कारवाई केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोणतेही चूकीचे कारण नसताना वीज मीटर तोडून नेल्याने वीज कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ कारभार पून्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने वीज कर्मचाऱ्यांची हुकूमशाही उरण मध्ये वाढत चालली असून याचा शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक त्रास सर्वसामान्यांना होत आहे.

ग्राहक क्र.०२५५२००१८०८८,श्री अनिल वामन पडते, वय ६७ वर्षे, राहणार मोहिनील अपार्टमेंट ए विंग १०१ म्हातवली, नागाव रोड, उरण ४००७०२, फोन नंबर ८०९७३९७०५९ हे नियमित वीज बिल भरत असतात.मात्र दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी राहुल शिंदे सहाय्यक अभियंता करंजा शाखा यांच्या हाताखाली असणारे सहकारी कमल खान व इतर कर्मचाऱ्यांनी अनिल वामन पडते व त्यांच्या इमारतीचा विजपुरवठा तोडून अनिल वामन पडते यांचा वीज मीटर कोणतेही चूक नसताना काढून नेला.अनिल वामन पडते यांच्या जागेत असलेले भाडेकरू समोरच्या इमारतीत राहत होते ते अनिल वामन पडते यांच्याकडे जागा भाड्‌यानी घेउन राहत होते.समोरच्या इमारती मधील मीटर बामणे बिल्डर च्या नावे असून त्याची थकबाकी वसुल करणेसाठी अनिल वामन पडते यांच्याकडे भाड्यानी राहायला आलेल्या भाडेकरूचा म्हणजे पर्यायाने पडते वीज ग्राहक असलेला विजपुरवठा थकबाकी नसताना भारतीय विद्युत कायदा ५६ अन्वये नोटीस न देता मेसेज मोबाईल वर न पाठवता अनधिकृतपणे अनिल वामन पडते यांना त्रास देणेच्या हेतूने वीज मीटर काढून नेले. तेव्हा अनिल पडते यांची मुलगी ॲड अंतरा अनिल पडते अणि तिचे सहकारी ॲड आकांक्षा ठाकूर व ॲड चेतन लोखंडे यांनी राहुल शिंदे आणि कमल खान यांना चांगलीच अद्दल घडवली. वीज कर्मचारी कायदा हातात घेउन या सगळ्या गोष्टी करत होते. वरून उद्धट वर्तन केले तसेच विजपुरवठा पूर्ववत करणेस नकार दिला. जेव्हा ॲड अंतरा अनिल पडते आणि सहकारी यांनी अधिक्षक अभियंता वाशी मंडळ यांना संपर्क केल्यावर विजपुरवठा पूर्ववत चालू केला, दिवसेंदिवस महावितरण विभागाची मक्तेदारी वाढत आहे फक्त बामणे बिल्डर आणि त्यांचे सहकारी किरण यांच्या सांगण्यावरून अनिल पडते यांच्या भाडोत्री कडून पैसे वसूल करायच्या हेतूने अनिल पडते यांना त्रास दिला सर्व सामान्य माणसांना धमकावून त्यांच्या कडून वसुली करण्याची ही कोणती नवीन पद्धत आहे ? असा सवाल उपस्थित होत आहे.या सर्व घटनेबाबत अनिल वामन पडते यांनी सांगितले की माझी भाडोत्री एक महिला असून ती अपंग आहे तिचा एक लहान असा आइस्क्रीम चा व्यवसाय आहे आमची काहीही चूक नसताना जवळ जवळ ५-६ तास आमचा विद्युत पुरवठा हा खंडित केला होता त्या मुळे माझ्या भाडोत्री चे नुकसान झाले आहे. वीज कर्मचाऱ्यांनी उर्मट भाषा वापरून आमचे नुकसान तर केलेच शिवाय मानसिक त्रास दिला, मिटर चे कोणत्याही डिफॉल्टर लिस्ट मध्ये नाव देखील नव्हते ॲड अंतरा अनिल पडते यांनी कमल खान यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले माझ्या जवळ ऑर्डर आहे तरी त्यांनी ऑर्डर लेखी असल्याचा पुरावा मागितला तर त्यांनी तो देण्यास नकार दिला. राहुल शिंदे आणि कमल खान यांची जणू काही हिटलरशाही चालू आहे असा प्रत्यय काल आला नाईलाजाने जिल्हाधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक महावितरण व महाराष्ट्र राज्य विद्युत नियम आयोग यांचेकडे दाद मागावी लागत आहे.असे मत अनिल वामन पडते यांनी व्यक्त केले आहे.

ग्राहक क्र. ०२५५२००१८०८८ श्री अनिल वामन पडते, वय ६७ वर्षे, राहणार मोहिनील अपार्टमेंट ए विंग १०१ म्हातवली, नागाव रोड, उरण ४००७०२, फोन नंबर ८०९७३९७०५९ यांचे बिल भरलेलं असतानाही पूर्वसूचना व नोटीस न देता विजपुरवठा खंडित करून मानसिक त्रास दिल्यामुळे श्री राहुल शिंदे सहाय्यक अभियंता करंजा शाखा व कमल खान (वायरमन) यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अनिल वामन पडते यांनी शासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार करून दाद मागितली आहे.या संदर्भात अतिरिक्त कार्यकारी अभियंता उरण यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.ग्राहकांशी, जनतेशी उद्धटपणाने वागणाऱ्या व कायदा हातात घेणाऱ्या वीज कर्मचारी राहुल शिंदे व कमाल खान यांच्यावर प्रशासन कोणती कारवाई करते हे पाहणे आता औउत्सुक्याचे ठरेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे