pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

किटकजन्य आजारावर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि. 28

डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एस.डी. गावंडे यांनी केले आहे.
हिवताप प्रतिरोध महिनाअंतर्गत जालना येथील इंदिरा नगरात हिवताप जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आरोग्य विस्तार अधिकारी आर.के.मंडाळ, महेंद्र वाघमारे, एस.डी.दुसाने, बी.ई.गांगुर्डे, के.एस.पालवे, एस.के.नरवडे, एस.के. तेलंगे, टी.एस.पवार, एस.टी.आगळे, रितेश तौर उपस्थित होते.
जालना येथील इंदिरा नगरातील हिवताप तसेच डेंगी चिकन गुनिया, हत्तीरोगाचे लक्षणे व उपचार, शासकीय योजनांची माहिती हिवताप विरोधी सुधारीत औषध योजना, शासकीय योजनांबरोबर जनतेच्या सहकार्याची आवश्यकता, सर्वेक्षण फवारणी, डासोत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी मासेंची उपयुक्तता, मच्छरदाण्याचा वापर, डासाच्या चावण्यापासून रक्षणासाठी विविध उपायांची माहिती व संपूर्ण हिवताप, किटकजन्य आजार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. असे जिल्हा हिवताप अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2

Related Articles