महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन !

जालना/प्रतिनिधी,दि.22
१०० शिक्षक क्लब तर्फे संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त.जालना येथील १०० शिक्षक क्लब तर्फे भारतीय राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्षे साजरे करण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत त्याची सुरुवात राज्यस्तरीय शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेपासून होत आहे अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे १०० शिक्षक समुहाचे अध्यक्ष राजेभाऊ मगर, कार्याध्यक्ष आर.आर. जोशी व स्पर्धा समितीचे अध्यक्ष संदीप इंगोले यांनी दिली.
या पत्रकातील सविस्तर माहिती अशी आहे की,ही स्पर्धा रविवार दिनांक २५/०८/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजेपासून जालना जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न होणार आहे .या स्पर्धेत महाराष्ट्रातील ९५ स्पर्धकांनी नोंदणी केलेली आहे. स्पर्धेतील सहभाग हा विनामूल्य आहे. परीक्षणासाठी तज्ञ परीक्षकांची निवड करण्यात आली आहे.यातून गुणवत्तेच्या आधारे गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या सहा विजेत्यांना रोख रक्कम ५०००,४०००,३०००,२०००१०००,७०० ₹ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना ह्या उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ,शिक्षणाधिकारी श्रीमती मंगलताई धुपे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, शिक्षण उपनिरीक्षक डॉ. सतीश सातव, प्राचार्य श्रीमती कविता प्राशर, उपशिक्षणाधिकारी शाम देशमुख, उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत,अधीक्षक मकरंद सेवलीकर, गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, डायटचे संजय येवते, प्राचार्य धम्मरत्न वायवळ,प्रा. जवाहर काबरा, प्रा . डॉ. यशवंत सोनुने,प्रा. डॉ. सुजाता देवरे/अग्निहोत्री,प्रा. एम.जी. जोशी, आर. आर. जोशी, उदय शिंदे व ज्ञानेश्वर (माऊली) बोरूडे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेच्या आयोजनासाठी आर.आर. जोशी, राजेभाऊ मगर संदीप इंगोले, डॉ. शिवनंदा मेहेत्रे,माया कवानकर,मनिषा पाटील, कविता दाभाडे,ज्योती जोशी
जमीर शेख ,दत्ता देशमुख, संतोष लिंगायत,दत्तात्रय राऊतवाड,चंद्रकांत धोत्रे,दिपक चाटे,पठाण साजीद खान, रामेश्वर धोपटे, विजय निकाळजे, विष्णू बिरादार,जगन वाघमोडे, मंदाकिनी खलसे,सविता तायडे, स्वाती गव्हाणे,प्रभा जाधव,प्रदीप घाटेशाही, नारायण भुजंग,अमोल कंडारे व सर्व पदाधिकारी १०० शिक्षक क्लब ऑफ जालना परिश्रम घेत आहेत.