भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या छ.संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्षपदी पदी संतोष थोरात यांची निवड

संभाजीनगर/प्रतिनिधी,दि.7
आज रोजी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी छत्रपती संभाजी नगर जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष थोरात यांची निवड झाली असून या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. प्रमोदजी वाकोदकर साहेब यांच्या सूचनेनुसार व मा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवतजी कराड साहेब केंद्रीय रेल्वे राज्य मत्रीं रावसाहेब दानवे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आमदार प्रशांतजी बंब आ.हरीभाऊ बागडेनाना व प्रदेश सरचिटणीस .संजयजी केनेकर छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष संजयजी खबांयते यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेशजी सोनवणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन उद्योग आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष थोरात यांची निवड करण्यात आली आहे यावेळी उपस्थित ओबीसी मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख आनिल वाढोणकर उद्योग आघाडीचे पश्चिम तालुका प्रमुख संपत रोडे यांची उपस्थिती होती व संतोष थोरात यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.