पार्थ फाउंडेशन तर्फे पर्यावरण पूरक गणेशोत्सव मंडळांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16
पार्थ फाउंडेशन हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली व संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली सामाजिक संस्था असून या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ फाउंडेशनचे कार्य सर्वत्र जोरात सुरू आहे.
सध्याचे पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन पर्यावरणाचे, निसर्गाचे संवर्धन संरक्षण व्हावे या अनुषंगाने तसेच पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक पर्यावरण पूरक गणेशोत्सव मंडळ म्हणून पार्थ फाउंडेशन तर्फे गणेश मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राजे शिवाजी मित्र मंडळ बुरुड आळी कोटनाका, जय शिवराय युवक मंडळ कामठा, गणेशोत्सव सार्वजनिक देऊळवाडी युवक मंडळ देऊळवाडी,श्री गणेशोत्सव मंडळ उरण स्वामी विवेकानंद चौक,शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती चौक उरण या सार्वजनिक मंडळाना पार्थ फॉउंडेशन तर्फे पर्यावरण पूरक गणेशोत्सव मंडळ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याने सर्व गणेशोत्सव मंडळानी पार्थ फॉउंडेशनच्या सदर उपक्रमाचे कौतुक केले. सदर सन्मानचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर व इतर पदाधिकारी यांच्या शुभहस्ते देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाचे उरण तालुका युवा अध्यक्ष समत भोंगले, उरण तालुका सरचिटणीस दिनेश पाटील ,उरण तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस -अमित साहू,नागाव पंचायत विभाग अध्यक्ष संदेश म्हात्रे,घारापुरी अध्यक्ष त्रिकाळ पाटील, स्वप्नील कुंभार, दीपराज ठाकूर,भूषण ठाकूर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.