pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पिठोरी सिरसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

0 1 7 3 9 9

शहगड/तनवीर बागवान,दि.28

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नूतन वसाहत शाळेत दि.२८ एप्रिल रोजी इयत्ता पहिली प्रवेश शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच कृष्णा आटोळे हे होते.तर प्रमुख पाहुणे ग्रामसेवक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णु महाराज वायसे,उपाध्यक्ष दत्ता गावडे उपस्थित होते.

यावेळी इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच शाळेतील मुख्याध्यापकांच्या हस्ते हार,पुष्पगुच्छ,पुस्तक,वही,चॉकलेट देऊन स्वागत केले.इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात आला.

तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे स्वागत करण्यात आले.यावेळी शिक्षणप्रेमी व समाजसेवक राजेंद्र पवार,अंगणवाडी ताई,पालक,माता पालक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे लावण्यासाठी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येवले सर व उपस्थित आमचे आभार सहशिक्षक मुळे यांनी मानले.अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात मेळावा संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे